खासदार उदयनराजे भोसले यांचा ५१ वा वाढदिवस, आज विविध कार्यक्रम

आपल्या वेगळयाच शैलीसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा ५१ वा वाढदिवस आज साजरा होत आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं उदयनराजे भोसले यांनी, शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 24, 2018, 08:37 AM IST
खासदार उदयनराजे भोसले यांचा ५१ वा वाढदिवस, आज विविध कार्यक्रम title=

सातारा : आपल्या वेगळयाच शैलीसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा ५१ वा वाढदिवस आज साजरा होत आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं उदयनराजे भोसले यांनी, शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. 

यांना कार्यक्रमाचे निमंत्रण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, यांच्यासह राज्यातल्या बहुतेक सर्वच पक्षांतल्या नेत्यांना, उदयनराजेंनी वाढदिवसानिमित्तानं होणाऱ्या कार्यक्रमाची निमंत्रणं धाडली आहेत. 

विकासकामांना गती

यावेळी साताऱ्याला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढवणं, भुयारी गटार योजनेचं भूमिपूजन, या आणि इतरही विकासकामांचा शुभारंभ केला जाणार आहे. सोबतच एका मेळाव्याचंही आयोजन या निमित्तानं करण्यात आलं आहे. 

जोरादर शक्तिप्रदर्शन

या मेळाव्याला किमान लाखभर समर्थक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. या शक्तिप्रदर्शनातून आपल्यासाठी सर्वच पक्षांचे दरवाजे खुले असल्याचा संदेश उदयनराजे देत असल्याचं बोललं जात आहे.