Urfi Javed चा पुन्हा पंगा! मी आत्महत्या करेन नाहीतर...; चित्रा वाघ यांच्याविरूद्ध वादग्रस्त विधान

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद हिने पुन्हा एकदा भाजप नेत्या चित्रा वाघ यांना उद्देशून वादग्रस्त विधान केलं आहे. काय म्हणाली उर्फी पाहा. 

Updated: Jan 4, 2023, 03:06 PM IST
Urfi Javed चा पुन्हा पंगा! मी आत्महत्या करेन नाहीतर...; चित्रा वाघ यांच्याविरूद्ध वादग्रस्त विधान        title=

Chitra Wagh vs Urfi Javed : सोशल मीडियातील वादग्रस्त अभिनेत्री ऊर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचातला वाद टोकाला गेलाय. जिथे सापडेत तिथे उर्फी जावेदला चोप देण्याचा इशारा चित्रा वाघांनी दिलाय. भर रस्त्यावर अतरंगी कपडे घालून फिरणाऱ्या ऊर्फी जावेदविरोधात चित्रा वाघांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) तक्रार नोंदवून अटक करण्याची मागणी केली. त्यावर ऊर्फीनं कारवाईसाठी चित्रा वाघ यांना खुलं आव्हान (Challenge) दिलं होतं. यावरुन आता चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहेत.  

यानंतर उर्फीने आता पुन्हा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये उर्फीने गंभीर विधान केले आहे. “राजकीय नेत्यांविरोधात वक्तव्य करणं माझ्यासाठी घातक ठरू शकते, हे मला माहीत आहे. पण, ते मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत. त्यामुळे एकतर मी आत्महत्या करेन किंवा त्यांच्याविरोधात बोलून माझा खून करुन घेईन. पण या सगळ्याची सुरुवात मी केलेली नाही. मी कोणाबरोबरही काहीच चुकीचं वागलेले नाही. काहीही कारण नसताना त्यांनी या सगळ्याची सुरुवात केली आहे”, असं गंभीर विधान उर्फी जावेदने केलं आहे.

वाचा : ऋषभ पंतच्या उपचाराबाबत मोठी बातमी, DDCA ने घेतला 'हा' निर्णय 

या दोघींचा वाद सुरू असताना शिंदे गटातील संजय राठोड (sanjay rathod ) यांचे नाव समोर आले. याआधी उर्फीने ट्विट करत चित्रा वाघ यांना संजय राठोड प्रकरणाची आठवण करुन दिली. 'मी भाजपमध्ये प्रवेश केल्यास चित्रा वाघ यांच्याशी मैत्री करायची वाट पाहू शकत नाही. तुम्हाला संजय आठवतोय का..? भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही संजय राठोड यांच्या सर्व चुका विसरलात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या विरोधात खूप हल्लाबोल केला होता.' असे ट्विट उर्फीनं केलं आहे.

दरम्यान असे असताना चित्रा वाघ व उर्फी जावेद यांच्या वादात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही उडी घेतली. उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन बोलणाऱ्या चित्रा वाघ यांना सुषमा अंधारेंनी केतकी चितळे, अमृता फडणवीस व कंगना रणौत यांचे काही फोटो शेअर करत खोचक सवाल केला आहे.