Rishabh Pant Accident: टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारचा 30 डिसेंबरला भीषण (Car Accident) अपघात झाला. आगीने खाक झालेल्या गाडीमधून ऋषभ थोडक्यात बचावला आहे. या अपघातात त्याच्या डोक्याला, पाठील आणि गुडघ्याला दुखापत झाली. या भीषण अपघातानंतर आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्याला ICU मधून प्रायव्हेट वॉर्डला शिफ्ट करण्यात आले होते. आता ऋषभ पंतच्या उपचारादरम्यान मोठी बातमी समोर येत आहे.
दिल्लीहून देहरादूनला (Dehradun) जाताना पंतला अपघात झाला होता. त्यामुळे त्याला जवळील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (DDCA director) संचालक श्याम शर्मा (Shyam Sharma) पंतला भेटण्यासाठी डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये (Max Hospital) पोहोचले, तेथं त्यांनी पंतशी चर्चा केली आणि यादरम्यान पंतने अपघाताबद्दल खुलासा केलाय.
श्याम शर्मा (Shyam Sharma) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पंतने सांगितले की त्याचा अपघात डुलकीमुळे झाला नाही तर खड्ड्यामुळे झाला. रात्रीची वेळ होती. त्यामुळे स्पष्ट दिसत नव्हतं. एक खड्डा होता, तो वाचवण्यासाठी गेल्यावर अपघात झाला, असं रिषभने (Rishabh revealed about accident) सांगितलं.
वाचा: रेल्वेत Confirm सीट मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्ही करताय का ही चूक? खातं रिकामं होईल
याचदरम्यान आता ऋषभ पंतविषयी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (DDCA) मोठा निर्णय घेतला असून DDCA ऋषभला मुंबईत हलवण्याचा निर्णय घेतलाय. डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा यांनी ही माहिती दिलीय. मुंबईत ऋषभच्या लिगामेंटवर उपचार केले जातील. कार अपघातात ऋषभच्या डोक्याला मार लागलाय. तसंच पाठीवर मोठी जखम आहे. तसेच त्याच्या उजव्या गुडघ्यातील लिगामेंट फाटले असून उजव्या हाताच्या मनगटावर, घोट्याला, पायाला बोटाला दुखापत झाली आहे. पंतची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे, मात्र आता बीसीसीआयने त्याच्यावर चांगले उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान पंतच्या एमआरआय स्कॅन अहवालात कोणतीही अडचण आली नाही. अपघातानंतर बीसीसीआयने डीडीसीएला पंतच्या सतत संपर्कात राहून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते.