मोर्चेकरांकडून उर्से टोलनाक्याची तोडफोड

 मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबईला गेलेल्या काही मोर्चेकरांनी मोर्चाहून परतत असताना उर्से टोलनाक्याची तोडफोड केली. 

Updated: Aug 10, 2017, 01:19 PM IST
मोर्चेकरांकडून उर्से टोलनाक्याची तोडफोड title=

पुणे : मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबईला गेलेल्या काही मोर्चेकरांनी मोर्चाहून परतत असताना उर्से टोलनाक्याची तोडफोड केली. रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली. 

मराठा क्रांती मोर्चातील अंदोलक सकाळी मुंबईला जात असताना उर्से टोलनाक्यावरील बॅरेकेट त्यांच्या वाहनावर पडले आणि त्यात त्यांच्या गाडीच्या काचेला तडा गेला.

 याचा राग मनात ठेवून मुंबई वरुन पुन्हा परतत असताना या मोर्चेकरांनी ऊर्से टोलनाक्यावरील कर्मचां-याना वाहनाचे झालेल्या नुकसानी बाबत भरपाई मागितली. त्यानंतर टोल नाक्यावरील कर्मचारी आणि या मोर्चेकरांमध्ये झालेल्या शाब्दीक वादवादीचे रुंपातर भांडणात झाले.

८ ते १० मोर्चेकऱ्यानी अरेरावी करत दोन टोल नाक्याची तोडफोड केली आणि ते सर्व घटना स्थळावरून पसार झाले. सदर घटनेची खबर मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या या टोल नाक्याला छावणी चे स्वरूप आलं आहे.