मुंबई असुरक्षित होतेय? 24 वर्षीय तरुणीसोबत अश्लील चाळे, आरोपीने धावत्या लोकलमधून मारली उडी

Mumbai Local Crime News Today: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा भयंकर प्रकार समोर आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 30, 2023, 11:30 AM IST
मुंबई असुरक्षित होतेय? 24 वर्षीय तरुणीसोबत अश्लील चाळे, आरोपीने धावत्या लोकलमधून मारली उडी title=
Woman sexually harassed on Mumbai local train

Women Sexual Harrasement in Mumbai Local News: मुंबईची लाफइलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमध्ये (Mumbai Local) चाललंय काय? असाच प्रश्न सध्या निर्माण होत आहे. गेल्या महिन्याभरात मुंबई लोकलमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तीन घटना समोर आल्या आहेत. धावत्या लोकलमध्ये एका तरुणाने 24 वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Women Harassed In Mumbai local)

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मालाड येथे राहणारी एक तरुणी कामानिमित्त चर्नी रोड येथे लोकलने जात होती. त्याचवेळी ग्रँड रोड स्थानकादरम्यान एका तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने आरडाओरडा केला असता त्याने तिथून पळ काढला. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

२३ जून रोजी चर्नीरोड ते ग्रँड रोड स्थानकादरम्यान हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तरुणीने पाच दिवसांनंतर पोलिसांशी संपर्क साधून तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीअज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध घेत आहेत. 

धावत्या लोकलमधून पळ काढला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी चर्नीरोड स्थानकातून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढली होती. ग्रँड रोड स्थानक येताच एका तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. आरोपी तरुणाने अश्लील चाळे व वक्तव्य केल्याचंही तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे. तरुणीने आरडाओरडा करताच आरोपीने तिथून पळ काढला. लोकलचा वेग कमी होताच तो उडी मारुन पळाला, असं तिने तक्रारीत म्हटलं आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. 

महिन्याभरात दुसरी घटना

दरम्यान, मुंबई महिलांसाठी सुरक्षित मानली जाते. त्यात लोकलमध्ये गेल्या महिन्याभरात घडलेल्या घटनांमुळं महिला प्रवाशांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 14 जून रोजी हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि सीएसएमटी स्थानकादरम्यान एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. पीडित मुलगी गिरगावयेथील रहिवाशी असून नवी मुंबईतील बेलापूर येथे एका जात होती. सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना आरोपीदेखील ट्रेनमध्ये चढला. पीडित तरुणी एकटी असल्याचा फायदा घेऊन त्यांने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तरुणीने आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपीने मस्जिद बंदर स्थानकावरुन पळ काढला.