शेअर मार्केटमध्ये 25 लाख गमावले; EDची धमकी देत उकलले पैसे, नंतर जेलची हवा

 Nashik Worker loses 25 lakhs in stock market : शेअर मार्केटमध्ये 25 लाख रुपये बुडाल्याने कामगावार पश्चाताप करण्याची वेळ आली. 

Updated: Jul 28, 2022, 03:03 PM IST
शेअर मार्केटमध्ये 25 लाख गमावले; EDची धमकी देत उकलले पैसे, नंतर जेलची हवा title=

नाशिक : Nashik Worker loses 25 lakhs in stock market : शेअर मार्केटमध्ये 25 लाख रुपये बुडाल्याने कामगावार पश्चाताप करण्याची वेळ आली. दरम्यान, 25 लाख गमावल्यानंतर EDची धमकी देत बिल्डरकडून वसूल करण्याचा फंडा अवलंबला. मात्र, स्वत:च पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आता तो जेलची हवा खात आहे. 

नाशिक शहरात बांधकाम व्यवसायिकला इडीची धमकी देत 47 लाखांची खंडणी मागणाऱ्या संशयिताला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. मारुती खोसरे अस पोलिसांनी पकडल्या संशयीताच नाव आहे. या घटनेने बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे शेअर मार्केटमध्ये संशयताचे 25 लाख बुडाल्यानंतर पाच वर्षांपूर्वी तो ज्या बांधकाम व्यवसायिकाकडे कामास होता. त्यांनाच ईडीकडे तुमच्या मालमत्तेची तक्रार करेल अशी धमकी देत त्यांच्याकडे 47 लाखांची मागणी केली. त्यातून पाच लाखांची रोकड सोमवारी संशिताला देण्यात आली होती. तर उर्वरित रकमेसाठी  संशयिताने पुन्हा फोन केल्याने बांधकाम व्यवसायिक समीर सोनवणे यांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून संशयित मारुती खोसरे याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली. यावेळी त्याने बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयातून व्यवसायांचा डाटा चोरुन त्याची तक्रार ईडीकडे करण्याची धमकी देत पैशांची मागणी केल्याचे पोलीस तपासात समोर आल आहे.