सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर, निमित्त वळसे पाटील यांचा एकसष्टी सोहळा

विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्टी निमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर दिसून आलेत. 

Updated: Oct 27, 2017, 12:34 PM IST
सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर, निमित्त वळसे पाटील यांचा एकसष्टी सोहळा  title=

मुंबई : विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्टी निमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर दिसून आलेत. 

यावेळी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी कवितांतून चौफेर फटकेबाजी केली. उपस्थित अनेक दिग्गज नेते मंडळींना हसू आवरता आले नाही. तसेच वळसे-पाटील यांच्या आठवणी सांगताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आपल्या भावना यावेळी अनावर झाल्या नाहीत.

एकसष्टी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्य मंत्री रामदास आठवले यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांनी उपस्थित लावली आहे. 

या कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील यांच्यावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. एकसष्टी सोहळा सुरु आहे.