राणेंचा नवा पक्ष भाजपची नवीन खेळी - अशोक चव्हाण

नारायण राणे यांनी नवीन पक्ष काढणे म्हणजे शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी भाजपने केलेली नवीन खेळी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.

Updated: Oct 2, 2017, 05:18 PM IST
राणेंचा नवा पक्ष भाजपची नवीन खेळी - अशोक चव्हाण title=

मुंबई : नारायण राणे यांनी नवीन पक्ष काढणे म्हणजे शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी भाजपने केलेली नवीन खेळी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.

नारायण राणेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देईपर्यंत चव्हाणांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नव्हती. तर राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर चव्हाणांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आता राणेंनी नव्या पक्षाची घोषणा केल्यानंतर चव्हाणांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. शिवसेना सत्तेत सामिल असल्यामुळे त्यांच्यावर टीका करणे भाजपला अवघड जात होतं. त्यामुळे राणेंना पुढे करून शिवसेनेवर अटॅक करण्यासाठी ही खेळी असल्याची प्रतिक्रिया चव्हाणांनी दिली.