पश्चिम रेल्वेवर १० फेऱ्यासह १२२ फेऱ्यांचा विस्तार

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी चांगली बातमी. पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल.

Updated: Oct 30, 2018, 09:54 PM IST
पश्चिम रेल्वेवर १० फेऱ्यासह १२२ फेऱ्यांचा विस्तार title=

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी चांगली बातमी. पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय.  नव्या वेळापत्रकात १० फेऱ्या वाढविण्यात आल्यात. त्यामुळे आता १२२ फेऱ्यांचा विस्तार होणार आहे. येत्या १ नोव्हेबंरपासून पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात होणार आहे.पश्चिम रेल्वे मार्गावर १२२ लोकलच्या फेऱ्यांचा विस्तार करण्यात  आल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळेस मोठा दिलासा मिळणार आहे. 

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू करण्यात येते. पश्चिम रेल्वेच्या यंदाच्या वेळापत्रकात नाविन्यपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. वाढीव फेऱ्यांमुळे परेवरील दिवसभरातील लोकलच्या फेऱ्यांची संख्या १३५५ वरुन १३६५ वर जाणार आहे.

तसेच हार्बर मार्गावरील ११० फेऱ्यांचा देखील समावेश आहे. वाढीव १० फेऱ्यांमध्ये ४ फेऱ्या डाउन दिशेला. यामध्ये दोन जलद फेऱ्या चर्चगेट ते विरार, एक जलद फेरी चर्चगेट ते डहाणु रोड आणि एक धिमी लोकल विरार ते डहाणू मार्गावर चालविण्यात येणार आहेत. तर ६ नवीन फेऱ्या अप मार्गावर धावणार आहेत. यामध्ये विरार ते चर्चगेट दरम्यान २ जलद लोकल, डहाणू रोड ते विरार दरम्यान २ धीम्या लोकल आणि विरार ते बोरीवली आणि भाईंदर ते अंधेरी दरम्यान प्रत्येकी १-१ फेरी चालविण्यात येणार आहे.

डाउन दिशेच्या ६६ तर अप मार्गावरील ५६ फेऱ्यांचा विस्तार करण्यात आलेला आहे. नवीन वेळापत्रकात २६ फेऱ्यांचा वेग वाढविण्यात आलेला आहे. एसी लोकलला मरिन लाईन्स, चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, दहिसर, मीरा रोड, नायगाव आणि नालासोपारा या स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. तसेच संध्याकाळची ६.५१ ची चर्चगेट ते भाईंदर महिला स्पेशल लोकल आता विरारपर्यंत तर सकाळी ९.५६ ची वसईरोड ते चर्चगेट लोकल विरार स्थानकातून धावणार आहे.