Iqbal Singh Chahal Inquiry By ED: "मुंबईमध्ये उत्तर प्रदेशप्रमाणे..."; संजय राऊतांचा BJP ला टोला, गुजरातचाही केला उल्लेख

Iqbal Singh Chahal Inquiry by ED: इक्बाल सिंह चहल यांना आज चौकशासाठी मुंबईमधील ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Updated: Jan 16, 2023, 12:01 PM IST
Iqbal Singh Chahal Inquiry By ED: "मुंबईमध्ये उत्तर प्रदेशप्रमाणे..."; संजय राऊतांचा BJP ला टोला, गुजरातचाही केला उल्लेख title=
iqbal singh chahal inquiry by ED

Iqbal Singh Chahal Inquiry by ED: मुंबईमधील कोविड सेंटर घोटाळा (Mumbai Covid Centre Scam) प्रकरणामध्ये आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल () यांना सक्तवसुली संलचनालय म्हणजेच ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. कोविड सेंटरसंदर्भातील व्यवहारांचे कागदपत्रं घेऊ चहल (iqbal singh chahal) यांना आज चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात चहल यांची पाठराखण करत भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्यांमधील परिस्थितीचा संदर्भ देत टोला लगावला आहे.

सर्व यंत्रणा केंद्राने ताब्यात घेतल्या

इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी कोरोना कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अत्यंत पारदर्शक व्यवहार झाल्याचा दावा केला. तसेच यावेळी राऊत यांनी गुजरातमध्ये रुग्णालयात जागा मिळत नव्हत्या. कोवीड काळात उत्तर प्रदेशामध्ये गंगेत प्रेतं वाहत होती, अशी आठवण करुन देत अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला. सध्या सर्व यंत्रणा केंद्राने ताब्यात घेतल्या आहेत. या सरकारच्या काळात बदनामीच्या मोहीमा राबवल्या जात आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

मुंबईमध्ये नदीत मृतदेह तरंगले नाहीत

मुंबईत नदीत मृतदेह नदीत तरंगले नाहीत. डॉक्टर आणि नर्सेस पळून जात होते पण यूपीप्रमाणे मुंबईमध्ये नदीत मृतदेह तरंगले नाही. अशा परिस्थितीही पादर्शक काम झालं, असं राऊत म्हणाले. सर्व यंत्रणा केंद्राने ताब्यात घेतल्या असून न्यायव्यवस्थेवर घाला घालण्याचं काम केंद्र सरकार करत आहे, असंही राऊत यांनी भाजपावर टीका करताना म्हटलं.

शिंदेवरही केली टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दावोसला गेल्याच्या मुद्द्यावर बाष्य करताना दावोसला जगभरातून लोक येत असतात. तिथं जाऊन किती उद्योग आणले सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रात आणलेले अनेक प्रक्लप गुजरातला गेले. ते प्रकल्प अगोदर परत आणा मग दावोसला जा, असा टोला राऊतांनी शिंदेंना लगावला. मुंबईत आलेले अनेक प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात आले. मुख्यमंत्र्यांनी दावोसला जाण्याऐवजी गुजरातला जावं असा टोलाही राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.