मुंबईतील गिरगावमध्ये कोठारी हाऊस इमारतीला आग

आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

Updated: Jun 24, 2018, 07:48 PM IST

मुंबई : मुंबईतील गिरगाव लेन परिसरात मोठी आग लागली आहे. कोठारी हाऊसला आग लागली आहे. तीन जण यात अडकल्याची माहिती समोर येते आहे. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सेंट्रल प्लाझा सिनेमाजवळ ही ३ मजल्यांची इमारत आहे. इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे.