काळाचौकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे पाद्य पूजन

पुढच्या महिन्यात गणपतीचे आगमन होत आहे. गणेशोत्सवासाठी सर्वांचीच तयारी सुरु झालेय. काळाचौकी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या गणपतीचे पाद्य पूजन मोठ्या उत्साहात झाले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 13, 2017, 01:03 PM IST
काळाचौकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे पाद्य पूजन title=

मुंबई : पुढच्या महिन्यात गणपतीचे आगमन होत आहे. गणेशोत्सवासाठी सर्वांचीच तयारी सुरु झालेय. काळाचौकी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या गणपतीचे पाद्य पूजन मोठ्या उत्साहात झाले.

संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त साधत काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणरायाचा पाद्यपूजन सोहळा काल ढोलताशांच्या गजरात पार पडला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमरदीप गोसावी आणि आरती गोसावी यांनी 'श्री'च्या सोन्याच्या पावलांचे पूजन केले.

यावेळी प्रमुख कार्यवाह अमन दळवी, कार्याध्यक्ष अनिल चव्हाण, कोषाध्यक्ष योगेश गावडे, प्रकाश राणे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच या सोहळ्याला  भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.