Mumbai Video : चेंबूरमध्ये इमारतीसमोरील जमीन खचली, डोळ्यादेखत खड्ड्यात कोसळली 40 ते 50 वाहनं

Mumbai Landslide Video :  आताची सर्वात मोठी बातमी आहे. मुंबईतील चेंबूरमधील इमारतीसमोरील जमीन खचल्यामुळे डोळ्यादेखत खड्ड्यात 40 ते 50 वाहनं खड्ड्यात कोसळल्या आहेत.  

Updated: Jul 5, 2023, 01:14 PM IST
Mumbai Video : चेंबूरमध्ये इमारतीसमोरील जमीन खचली, डोळ्यादेखत खड्ड्यात कोसळली 40 ते 50 वाहनं title=
Mumbai Chembur Suman Nagar Landslide 40 to 50 vehicles fell video zee24 taas exclusive today trending news

Mumbai Landslide Video : मुंबईतील चेंबूरमधील एका धक्कादायक घटनेने मुंबईकरांची झोप उडवली आहे. चेंबूर सुमन नगरमधील राहुल नगर नंबर दोनमधील SRS इमारतीसमोरील जमीन अचानक खचली आहे. 

या घटनेनंतर तातडीने इमारत खाली रिकामी करण्यात आली आहे. या घटनेचा भीतीदायक व्हिडीओ समोर आला आहे. SRS इमारतीमधील नागरिकांच्या जवळपास 40 ते 50 वाहनं खड्ड्यात कोसळल्या. खड्ड्यात गाडी कोसळण्याचा व्हिडीओ झी24 तासाच्या हाती लागला आहे. घटनेची माहिती मिळतात.

धक्कादायक व्हिडीओ 

मुंबई अग्निशामक दल आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

हेदेखील वाचा - हृदयद्रावक Video; 3 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! महामार्गावर डोंगरावरुन तो महाकाय दगड आला अन्...

दरम्यान मुंबईत भांडुप, विक्रोळी आणि मागाठणे या सारख्या परिसरातील टेकडीच्या भागांवरील घरांना पावसाळात धोकादायक परिस्थितीत राहवं लागतं. मुंबईत पावसाळ्यात अशा अनेक घटना घडतात.