मुंबईत धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे

Updated: Aug 15, 2022, 10:48 PM IST
मुंबईत धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू title=

मुंबई : इमारतीचा स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुलुंडमध्ये घडली आहे. मुलुंड पूर्वच्या नाणेपाडा परिसरातील मोती छाया या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळला आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे. तळमजला अधिक दोन मजले अशी ही इमारत आहे. मुंबई महानगरपालिकेने धोकादायक इमारतीच्या संदर्भातील नोटीसही या इमारतीवर लावली होती. या इमारतीमध्ये दोन कुटुंबे वास्तव्यास होती.

स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जेष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीररित्या जखमी आहे. या घटनेनंतर इमारतीमधील सर्वांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आलं आहे.

त्यामुळे आता मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या इमारतीतील रहिवाशांना घरे खाली करण्याबाबत मुंबई महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र तरीही या इमारतीमध्ये काही जण राहत होते.