वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू, परळच्या ब्रीजवर धक्कादायक घटना

Parel Bridge Accident: परळ-भोईवाडा भागात अनोळखी वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Updated: Apr 13, 2024, 04:33 PM IST
वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू, परळच्या ब्रीजवर धक्कादायक घटना  title=

Parel Bridge Accident: परेलच्या ब्रीजवर एक विचित्र अपघात झालाय. या घटनेत एका पोलिसाचा दुर्देवी मृत्यू झालाय. परळ-भोईवाडा भागात अनोळखी वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धनराज घाग असे 25 वर्षीय शिपायाचे नाव होते. या अपघातामध्ये धनराज घाग यांचा मित्र गंभीर जखमी आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे

धनराज घाग हे ताडदेव सशस्त्र पोलिस दलात कार्यरत होते. ते आपला मित्र कल्पेश अनामालूच्यासोबत रात्री दुचाकीवरून बाहेर निघाले. पहाटेच्या सुमारास परळ-प्रभादेवी ब्रीजवरुन ते जात होते. त्यावेळी एका अनोळखी वाहनाने त्यांना धडक दिली. या घटनेत धनराज आणि कल्पेश गंभीर जखमी झाले.

अपघात झाला तेव्हा घटनास्थळी कोणी नव्हते. काही वेळाने एका टॅक्सी चालकाने दोघांना जखमी अवस्थेत पाहिले आणि जवळच्या केईएम रुग्णालयात नेले. तेथे उपचारादरम्यान धनराज यांचा मृत्यू झाला.

सध्या कल्पेश गंभीर जखमी असून त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

याप्रकरणी कल्पेशचे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला करत भोईवाडा पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करीत आहे.