राज्यातील ४ पोटनिवडणुकांच्या निकालाकडे लक्ष

राज्यात बुधवारी झालेल्या ४ पोटनिवडणुकांचाही निकाल आज जाहीर होणार आहे.  

Updated: Oct 12, 2017, 11:42 AM IST
राज्यातील ४ पोटनिवडणुकांच्या निकालाकडे लक्ष title=

पाहा लाईव्ह निकाल, करा इथं क्लिक

मुंबई : राज्यात बुधवारी झालेल्या ४ पोटनिवडणुकांचाही निकाल आज जाहीर होणार आहे. मुंबई महानगरपालिका क्रमांक ११६ ची पोटनविडणूक, शिवसेना आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरली. भाजपकडून जागृती पाटील तर शिवसेनेकडून मीनाक्षी पाटील उमेदवार होत्या. प्रमिला पाटील यांच्या मृत्यूमुळे ही पोटनिवडणूक घेतली गेली. 

पाहा नांदेड पालिका लाईव्ह निकाल, इथं करा क्लिक

पुणे महापालिका

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ मधल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक घेतली गेली. तत्कालीन उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनानं ही जागा रिक्त झाली होती. भाजपनं नवनाथ कांबळे यांची मुलगी हिमाली कांबळे हिला उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीकडून धनंजय गायकवाडांनी निवडणूक लढवली. 

नागपूर महापालिका

नागपूर महापालिकेच्या प्रभाग ३५ अ मधले भाजप नगरसेवक निलेश कुंभारे यांच्या अकाली निधनामुळे, पोटनिवडणूक घेतली गेली. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असल्यानं, या पोटनिवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष आहे. या निवडणुीत मुख्य लढत, भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. 

कोल्हापूर महापालिका

कोल्हापूर महापालिकेच्या ताराबाई पार्क प्रभाग क्रमांक 11 मध्ये पोटनिवडणूक झाली. ताराराणी आघाडीचे नगरसेवक निलेश देसाई यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे, ही पोटनिवडणूक झाली.