संप मागे घ्या सरकार चर्चेला तयार - सदाभाऊ खोत

संप मागे घ्या सरकार चर्चेला तयार असल्याचं आज कृषी आणि पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. दुधाचे दर गेल्या महिन्यातवाढलेले आहे, दुधाचा एक ब्रँड व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. चर्चेनेच प्रश्न सुटू शकतो. दूध - भाजी फेकण्याचं आंदोलन करू नये असंही आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. 

Updated: Jun 1, 2017, 03:40 PM IST
संप मागे घ्या सरकार चर्चेला तयार - सदाभाऊ खोत  title=

मुंबई : संप मागे घ्या सरकार चर्चेला तयार असल्याचं आज कृषी आणि पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. दुधाचे दर गेल्या महिन्यातवाढलेले आहे, दुधाचा एक ब्रँड व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. चर्चेनेच प्रश्न सुटू शकतो. दूध - भाजी फेकण्याचं आंदोलन करू नये असंही आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. 

१ जुलैपर्यंत सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत, तर सगळ्या प्रमुख शहराचा दूध, भाजीपाला रोखू असा स्पष्ट इशारा आज खासदार राजू शेट्टींनी दिला आहे. आजपासून राज्यात शेतक-यांनी पुकारलेल्या संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याचंही शेट्टींनी स्पष्ट केलं आहे. सरकारला सत्तेचा माज आलाय, त्यांना कसं नमवायचं हे आम्हाला ठाऊक असल्याचंही शेट्टींनी यावेळी म्हटलं आहे