विस्टाडोम कोच उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत

 मुंबई मडगाव दरम्यान धावणा-या जनशताब्दी एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहेत. 

Updated: Sep 17, 2017, 09:30 PM IST
विस्टाडोम कोच उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत  title=

मुंबई : मुंबई मडगाव दरम्यान धावणा-या जनशताब्दी एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहेत. उद्या पहाटे साडे पाच वाजता मुंबई सीएसएमटी इथून सुटणा-या जनशताब्दी एक्सप्रेसला पहिल्यांदा हा कोच जोडण्यात येणार आहे.

सर्व सोयीसुविधांनी युक्त असा हा विस्टाडोम कोच आहे. पारदर्शी छत, मोठ्या आकाराच्या काचेच्या खिडक्या, फिरणा-या खुर्च्या, स्वयंचलित दरवाजे, ही आणि इतरही अनेक अशी या विस्टाडोम कोचची वैशिष्ट्यं आहेत.

माणशी तब्बल सव्वा दोन हजार रुपये इतकं या कोचचं तिकीट आहे. असं असलं तरी या कोचचं दस-याचं येत्या 30 तारखेचं विक एन्ड बुकिंग आताच फुल झालं असल्याचं मध्य रेल्वेनं सांगितलंय.