पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, 30 मिनिटे गाड्या लेट

पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने, २५ते  ३० मिनिटांनी वाहतूक उशिराने धावत आहे. पालघर जवळील उमरोळी रेल्वे फाटकाजवळ रेल्वेरूळाला तडा केल्याने रेल्वेची वाहतूक कोलमडलेली आहे.  मुंबईकडे येणारी वाहतूक धिम्यागतीने सुरु असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 3, 2018, 09:56 AM IST
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, 30 मिनिटे गाड्या लेट title=
संग्रहित छाया

मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने, २५ते  ३० मिनिटांनी वाहतूक उशिराने धावत आहे. पालघर जवळील उमरोळी रेल्वे फाटकाजवळ रेल्वेरूळाला तडा केल्याने रेल्वेची वाहतूक कोलमडलेली आहे.  मुंबईकडे येणारी वाहतूक धिम्यागतीने सुरु असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या आहे.

रेल्वे रुळाला तडा

उमरोळी फाटका जवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेय. रेल्वे रुळाला तडा गेल्याने पालघरहून मुंबईकडे येणाऱ्या लोकल अर्धा तास उशिराने धावत आहेत. ऐन सकाळी सकाळी गर्दीच्यावेळी रेल्वेचा खोळंबा झाल्याने संपात व्यक्त करण्यात येत आहे. 

खोळंबा झाल्याने प्रवासी संतप्त

 उमरोळी रेल्वे फाटकाजवळ सकाळी ८ च्या सुमारास रेल्वे रुळाला तडे गेले. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर प्रवाशांसाठी जादा बसेसची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला. या घटनेमुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.