आमच्यात मतभेद नाहीत - अण्णा हजारे

मुफ्ती शमीम काझमी यांची टीम अण्णातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या नवीन वादाबद्दल बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले, आमच्यात मतभेत नाहीत, बैठकीतील माहिती बाहेर जात असल्याच्या कारणावरून किंवा रामदेव बाबांवरून टीम अण्णामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे अण्णा म्हणालेत.

Updated: Apr 23, 2012, 02:18 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली 

 

 

मुफ्ती शमीम काझमी यांची टीम अण्णातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या नवीन वादाबद्दल बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले, आमच्यात मतभेद नाहीत, बैठकीतील माहिती बाहेर जात असल्याच्या कारणावरून किंवा रामदेव बाबांवरून टीम अण्णामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे अण्णा म्हणालेत.

 

 

बाबा रामदेव यांना समर्थन देण्यावरून टीम अण्णांमध्ये घमासान सुरु आहे. रामदेव यांच्या आंदोलनाला पाठिंबा असला तरी त्यांच्या आंदोलनात टीम अण्णा सहभागी होणार नाही, असं टीम अण्णांचे सदस्य प्रशांत भूषण यांनी म्हटलं असतानाच खुद्द अण्णा हजारे यांनी रामदेव यांच्यासोबत आंदोलन करणार असल्याचं आज पुण्यात स्पष्ट केले.  टीम अण्णांमध्ये मतभेद नसल्याचा खुलासाही अण्णांनी यावेळी केला.

 

 

टीममधील एकमेव मुस्लिम सदस्य मुफ्ती शमीम काझमी यांचा राजीनामा, त्यांनी केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यावर केलेले आरोप यावरून टीममधील मतभेद वाढल्याचं स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर अण्णा नियोजित कार्यक्रम रद्द करून अण्णा राळेगणसिद्धीला परतलेत. टीम अण्णांच्या सदस्यांमधील मतभेदामुळे अस्वस्थ असलेल्या अण्णांची नाराजी त्यांच्या चेह-यवर स्पष्ट दिसत होती. दरम्यान, यापुढे बैठकीत मोबाईल वापरण्याबाबत काळजी घेणार असल्याचं अण्णांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे काझमी प्रकरणानंतर टीम अण्णा सतर्क झाल्याचं दिसत आहे.

 

नोएडा येथे झालेल्या टीम अण्णातील कोअर समितीतील सदस्यांच्या बैठकीत मुफ्ती शमिम काझमी हे रेकॉर्डिंग करताना आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. टीम अण्णामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. बैठकीतील माहिती बाहेर प्रसिद्ध करणाऱ्या सदस्याबाबत कोणीही प्रश्न उपस्थित केलेला नाही. त्यामुळे याबाबत आक्षेप असण्याचे कारणच नाही. तसेच रामदेव बाबांवरूनही आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे म्हटले आहे.