काँग्रेसची नाती, भाजपला मुद्दे !

गोव्यात सात वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसच्या मंत्री आणि आमदारांनी विधानसभेसाठी त्यांच्याच कुटुंबियांना उमेदवारी वाटून घेतली आहे आणि हा मुद्दा लावून धरत विरोधी पक्षाने रान उठवल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

Updated: Feb 15, 2012, 04:07 PM IST

www.24taas.com, गोवा

गोव्यात सात वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसच्या मंत्री आणि आमदारांनी विधानसभेसाठी त्यांच्याच कुटुंबियांना उमेदवारी वाटून घेतली आहे आणि हा मुद्दा लावून धरत विरोधी पक्षाने रान उठवल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

काँग्रेसकडून पाच कुटुंबात मिळून १२ जणांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये मंत्री आलेमाव यांच्या कुटुंबात चार जणांना, प्रतापसिंहराणे यांचा मुलगा विश्वजीत राणे, मंत्री रवी नाईक यांचा मुलगा रितेश, बाबूश मोन्सेरोत यांच्या बरोबर त्यांच्या पत्नीलाही उमेदवारी दिली आहे. तर मडकईकरांच्या घरात दोघांना उमेदवारी मिळाली.

काँग्रेसच्या या घराणेशाहीमुळं भाजपच्या हाती आयतं कोलीत सापडलं आहे, त्यामुळे हा मुद्दा काँग्रेसला अडचणीत आणण्याची चिन्हा दिसत आहेत.