Zeenews logo
English   
Sunday, May 19, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

दिल्लीत NCPची महत्वाची बैठक

www.24taas.com, नवी दिल्ली
 
दिल्लीत काँग्रेसवर नाराजी व्यक्त करणा-या आणि राज्यात मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या महत्वपूर्ण बैठक होत आहे. दिल्लीत होणा-या बैठकीत शरद पवार यांच्यासह सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
 
दिल्लीत काँग्रेस बद्दल तक्रार करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक मुद्द्यांबाबत नाराजी आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्येच राहणार की बाहेर पडून युपीए सरकारला बाहेरुन पाठिंबा देणार याबाबत उत्सुकता आहे.
 
दुसरीकडे राज्यातील काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी आहे. या नाराजीचा राज्यातील सरकारवर परिणाम होणार की नाही हे सुद्धा उद्याच्या बैठकीत स्पष्ट होणार आहे.

First Published: Sunday, July 22, 2012, 19:22

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: