मुख्यमंत्र्यांकडून मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर!

काँग्रेसमधली अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर दाखवलय. कॅबिनेटच्या एकंदर चार जागा रिक्त आहेत. त्यातल्या काँग्रेसच्या कोट्यातल्या तीन जागा आहेत.

Updated: Apr 22, 2012, 11:26 AM IST


www.24taas.com, नवी दिल्ली 

काँग्रेसमधली अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर दाखवलय. कॅबिनेटच्या एकंदर चार जागा रिक्त आहेत. त्यातल्या काँग्रेसच्या कोट्यातल्या तीन जागा आहेत. त्यासाठी काँग्रेसमध्ये लॉबिंग सुरु झालय. विशेषत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे ही इच्छुक आहेत. त्यामुळं त्यांना संधी द्यायची झाल्यास नवा प्रदेशाध्यक्ष शोधावा लागेल.

 

 

राष्ट्रवादीच्या आक्रमक रणनितीला शह देणं आणि पक्ष विस्तार करणं असं दुहेरी आव्हान काँग्रेसपुढं आहे. त्यामुळं काँग्रेसला नव्या दमाच्या नेत्यांना संधी द्यावी लागेल. याखेरीज नाराज कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी महामंडळाच्या लालदिव्याच्या गाड्यांचं अमिष दाखवण्यात आलयं.

 

 

मात्र यापुर्वी अनेकवेळा मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाच्या युक्त्यांची आवई उठायची प्रत्यक्षात मात्र असंतोष वाढू नये म्हणून निर्णयच घेतला जात नाही असा अनुभव कार्यकर्त्यांना आला. यावेळी तरी हायकमांडच्या ग्रीन सिघ्नलनंतर विस्तार आणि महामंडळाच्या नियुक्त्या तातडीनं होणार काय हा प्रश्न आहे.

 

 

दरम्यान दिल्लीहून परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधी आणि पंतप्रधानांसोबत चर्चा झाल्याचं सांगितलं. पंतप्रधानांसोबत राजकीय विषयावर चर्चा केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मात्र सोनिया गांधींसोबत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे सांगायला मुख्यमंत्र्यांनी नकार दिला.