राजधानी सुसाट...

भन्नाट वेग, राजेशाही थाट हे राजधानी एक्सप्रेसचं वैशिष्टयं. आता राजधानी एक्सप्रेसने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाच तुरा खोवला आहे. राजधानी एक्सप्रेसने नुकताच ताशी १४५ किमी वेगाची नोंद करुन भारतीय रेल्वेच्या इतिहास एका नव्या पर्वाचा प्रारंभ केला आहे.

Updated: Dec 28, 2011, 06:33 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

भन्नाट वेग, राजेशाही थाट हे राजधानी एक्सप्रेसचं वैशिष्टयं. आता राजधानी एक्सप्रेसने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाच तुरा खोवला  आहे. राजधानी एक्सप्रेसने नुकताच ताशी १४५ किमी वेगाची नोंद करुन भारतीय रेल्वेच्या इतिहास एका नव्या पर्वाचा प्रारंभ केला आहे.

आता पर्यंत राजधानी एक्सप्रेस तासाला १३० किलो मिटर वेगाने दौडत असे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई वडोदरा सेक्शनच्या विरार-डहाणू आणि सूरत  दरम्यान घेण्यात आलेल्या नव्या चाचण्यांमध्ये राजधानीने १५० किलोमिटर ताशी अंतर कापलं. रिसर्य अँड डिझाईन स्टँडर्डस ऑरगनायझेशनने या  चाचण्या घेतल्या. वेगाची चाचणी घेण्या अगोदर रेल्वेने रेल्वेमार्गाची कसून पाहणी केली होती. भारतात सध्या भोपाळ शताब्दी एक्सप्रेस ही  सर्वाधिक ताशी १६० किलोमिटर वेगाने अंतर कापते तिचा सरासरी वेग आहे ताशी ९३ किलोमिटर इतका आहे. आरएसडीओने राजधानीच्या या  विक्रम वेगाची नोंद महत्वपूर्ण कामगिरी म्हणून केली आहे.

Tags: