पिंपरी-चिंचवडचा महापौर कोण?

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळाल्यावर आता शहरात महापौर कोण याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. महापौरपदाच्या शर्यतीत आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांचं नाव आघाडीवर आहे. पण त्याचबरोबर अनेक अनुभवी नगरसेवकांनीही या पदावर दावा केला आहे.

Updated: Feb 22, 2012, 07:27 PM IST

कैलास पुरी, www.24taas.com, पुणे

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळाल्यावर आता शहरात महापौर कोण याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. महापौरपदाच्या शर्यतीत आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांचं नाव आघाडीवर आहे. पण त्याचबरोबर अनेक अनुभवी नगरसेवकांनीही या पदावर दावा केला आहे.

 

पिंपरी-चिंचवडमध्ये महापौरपदाची चर्चा सुरू होताच स्थानिक नेत्यांनी सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहेत. पक्षाकडे महापौरपदासाठी अनेक इच्छुक उमेदवार असल्याचं स्पष्ट करतानाच नेत्यांनी कुणाचंही नाव घ्यायचं टाळलं. पहिल्यांदा सभागृह नेत्याचा निर्णय होईल आणि महापौर मग ठरवला जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. असं असूनही आमदार विलास लांडे यांच्या पत्नीची निवड जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. गेल्या महापालिकेत एकही पद न घेतलेल्या मोहिनी लांडे यांनी महापौरपदासाठीच कुठलंही पद न घेतल्याची चर्चा आहे. पण इतरही अनुभवी नगरसेविकांनी केलेल्या दावेदारीमुळे चुरस वाढली आहे.

 

पिंपरीचा बालेकिल्ला अजित पवारांनी राखला आणि पिंपरी म्हणजे अजित पवार हे समीकरण आणखी पक्कं केलंय. त्यामुळे कोणी कितीही दावे करत असलं तरी महापौर मात्र दादाच ठरवणार.