सदाशिवराव मंडलिक होणार काँग्रेसवासी

कोल्हापूरचे अपक्ष खासदार सदाशिवराव मंडलिक २१ ऑक्टोबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Updated: Nov 5, 2011, 01:27 PM IST

झी २४ तास वेब टीम, कोल्हापूर

 

कोल्हापूरचे अपक्ष खासदार सदाशिवराव मंडलिक २१ ऑक्टोबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

 

काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा टार्गेट केलंय.  पवारांनी सहकार चळवळ मोडीत काढल्याचा आरोप मंडलिक यांनी केलाय. एकेकाळी पवार यांचे निकटवर्यीत असलेले मंडलिक अपक्ष म्हणून खासदार झाल्यावर त्यांचे कट्टर विरोधक बनलेत.

 

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत मंडलिक आपल्या कार्यकर्त्यांसह २१ ऑक्टोबरला कागलमध्ये होणा-या कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.