इंडियाच्या बॉलर्सची धुलाई

पर्थ टेस्टमध्ये पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाला १६१ रन्सवर ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी गारद केलं. त्यानंतर ऑसी बॅट्समनी इंडियाच्या बॉलर्सचा यथेच्छ समाचार घेताना एकही विकेट् न गमावता १६४रन्सचा स्कोअर केला आहे.

Updated: Jan 14, 2012, 01:31 PM IST

www.24taas.com ,पर्थ

 

पर्थ टेस्टमध्ये पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाला १६१ रन्सवर ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी गारद केलं. त्यानंतर ऑसी बॅट्समनी  इंडियाच्या बॉलर्सचा यथेच्छ समाचार घेताना एकही विकेट् न गमावता १६४रन्सचा स्कोअर केला आहे.

 

ज्या पिचवर इंडियाच्या बॅट्समनची ऑसी बॉलर्सला खेळताना तारांबळ होत होती. त्याच पिचवर ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनं इंडियाच्या बॉलर्सला सळो की पळो करून सोडलं. वॉर्नरनं ८९  बॉल्समध्ये १४  फोर आणि ३ सिक्सच्या जोरावर १११  रन्सची नॉट आऊट खेळी केली. कोवेनं आणि वॉर्नरनं ४८  ओव्हर्समध्ये १४८रन्सची नॉट आऊट ओपनिंग पार्टनरशिप केली. पहिल्या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे ऑस्ट्रेलियाचा वर्चस्व राहिलं.

 

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.


दुसऱ्या दिवशीही या जोडीने चांगली सुरूवात केली आहे. २७  ओव्हर्समध्ये १६४ रन्स ठोकल्या आहेत.  कोवेनं ८९  बॉल्समध्ये ४८  तर  वॉर्नरनं १११ रन्सवर खेळत आहेत.