टीम इंडिया द.आफ्रिकेला रवाना

दक्षिण आफ्रिकेत होणा-या टी-20 स्पर्धेसाठी टीम इंडिया रात्री उशीरा दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली. यावेळी टीममध्ये ऱॉबिन उथप्पानं कमबॅक केलयं. उथप्पा विरेंद्र सेहवागच्या जागी खेळणार आहे.

Updated: Mar 28, 2012, 09:01 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली 

 

 

दक्षिण आफ्रिकेत होणा-या टी-20 स्पर्धेसाठी टीम इंडिया रात्री उशीरा दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली. यावेळी टीममध्ये ऱॉबिन उथप्पानं कमबॅक केलयं. उथप्पा विरेंद्र सेहवागच्या जागी खेळणार आहे. सेहवागला यावेळीही विश्रांती देण्यात आली आहे. टी-20ची मॅच ३०मार्चला होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणा-या य़ा मॅचमध्ये टीम इंडियाचा कस लागणार आहे.

 

 

दक्षिण आफ्रिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत एकमेव ट्वेंटी-२० सामना होणार आहे. भारतीय संघात  रॉबिन उथप्पाला संधी देण्यात आली आहे. भारतीय संघ  ३० मार्चला हा ट्‌वेंटी २० खेळणार आहे.  दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय नागरिक स्थायिक झाल्याच्या घटनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने हा सामना होत आहे.  या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिस याचा सन्मान करण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ २८ मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेस रवाना होईल. या सामन्याआधी भारतीय संघ आशिया करंडक स्पर्धेत खेळणार आहे.

 

 

भारतीय संघ – महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), विराट कोहली (उपकर्णधार), रॉबिन उथप्पा, गौतम गंभीर, रोहित शर्मा, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, प्रवीण कुमार, विनय कुमार, राहुल शर्मा, युसूफ पठाण, इरफान पठाण, मनोज तिवारी.