भारताची अवस्था बिकट

भारत वि. ऑस्ट्रेलिया वनडे दरम्यान भारताची अवस्था जास्तच वाईट झाली. माकायच्या ओव्हरमध्ये रोहित शर्मादेखील बाद झाला. त्यामुळे भारताला चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे.

Updated: Feb 5, 2012, 05:17 PM IST

www.24taas.com, मेलबर्न

 

भारत वि. ऑस्ट्रेलिया वनडे दरम्यान भारताची अवस्था जास्तच वाईट झाली. माकायच्या ओव्हरमध्ये रोहित शर्मादेखील बाद झाला. त्यामुळे भारताला चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे. तर याच ओव्हरमध्ये भारताला तिसरा धक्का बसला आहे. त्यामुळे भारताची स्थिती बिकट झालेली आहे. विराट कोहली चांगला खेळत असताना. पाण्टिंगने चांगला कॅच घेऊन विराट खेळी करू दिली नाही.

 

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

 

तर लगेचच त्याच ओव्हरमध्ये भारताला गंभीरच्या रूपात दुसरा धक्का बसला. त्यामुळे भारताची अवस्था अगदी दयनीय झाली. फक्त १३ रन असताना भारताने महत्त्वपूर्ण अश्या दोन्ही विकेट गमावल्या. आलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्माने जास्त पडझड होऊ दिली नाही. १० ओव्हरपर्यंत भारताचा स्कोर ५४ रनवर २ विकेट होत्या. विराट कोहली २३ रनवर खेळतो आहे तर रोहित शर्मा देखील चांगली साथ देत २० रनवर पोहचला आहे. भारताला जिंकण्यासाठी २१ ओव्हरमध्ये आणखी १६२ रन्स आवश्यक आहे.

 

मेलबर्न येथे सुरू असलेल्या भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिल्या वन डे मॅचची भारताची सुरवात अत्यंत खराब झाली आहे. भारतासमोर ३२ ओव्हर्समध्ये २१७ रन्सचा पाठलाग करायला आलेले भारताचे आघाडीचे दोन्ही फंलदाज अगदी स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. तब्बल १० महिन्यानंतर वन डे क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याऱ्या सचिनकडून महाशतकाची अपेक्षा पुन्हा एकदा फोल ठरली आहे. सचिन दोन रन करून बाद झाला. सचिनने स्टेर्कच्या बॉलवर उत्कृष्ठ फटका मारला मात्र पॉईंटच्या क्षेत्रात उभ्या असणाऱ्या पॉण्टिंगने एक अफलातून सुर मारून सचिनचा कॅच घेतला.


भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिली वन डे मॅच मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमानुसार ३२ ओव्हर्स मध्ये २१७ रन्सचं आव्हान ठेवलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियाने मर्यादित ३२ ओव्हर्समध्ये पाच विकेट गमावून २१६ रन्सचा पल्ला गाठला. पण  डकवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर २१७ रन्स जिकंण्यासाठी आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाकडून वेडने ६९ बॉलमध्ये ६७ रन्स केले. तर डेव्हिड हस्सीने देखील ६१ रन्स केले. त्याचबरोबर माइक हस्सीने देखील महत्तवपूर्ण ४५ रन्सची खेळी केली. भारतातर्फे विनय कुमारने ३ विकेट घेतल्या. तर राहुल शर्मा आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी १-१ बळी मिळवले.

 

ऑस्ट्रेलिया : (216/5 ओव्हर 32.0 )

इंडिया : (66/4) 

ओव्हर : 11.5