जमाना ७०चा

70 च्या दशकात राजेश खन्नाच्या अनेक फिल्म्स आल्या. मात्र याच वेळेला आणखी एक सुपरस्टार हिंदी सिनेसृष्टीला मिळाला तो म्हणजे अमिताभ बच्चन...बिग बींच्या रुपात एक अँग्री मॅन सिनेसृष्टीला मिळाला..यानंतर या महानायकाच्या साथीने हिंदी सिनेमामध्ये आशयघन फिल्मस पाहायला मिळाल्या.

Updated: May 3, 2012, 09:44 PM IST

1970-1980

 

रिश्तें मै तो हम तुम्हारे बाप लगते है नाम है शहेनशहा.... हा जमाना होता डायलॉगबाजीचा... हा जमाना होता ऍक्शनपटाचा... हा काळ होता अँग्री यंग मॅनचा...

 

70 च्या दशकात राजेश खन्नाच्या अनेक फिल्म्स आल्या. मात्र याच वेळेला आणखी एक सुपरस्टार हिंदी सिनेसृष्टीला मिळाला तो म्हणजे अमिताभ बच्चन...बिग बींच्या रुपात एक अँग्री मॅन सिनेसृष्टीला मिळाला..यानंतर या महानायकाच्या साथीने हिंदी सिनेमामध्ये आशयघन फिल्मस पाहायला मिळाल्या. बेरोजगार, बेकारीने कंटाळून गुन्हेगारीकडे वळलेल्या तरुणाचं चित्रण याच दशकात प्रेक्षकांना सिल्व्हर स्क्रीनवर पाहायला मिळालं.तर ‘शोले’ सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीमध्ये इतिहास घडला. 70 च्या दशकातच सलीम-जावेद जोडीच्या लेखणीचा ठसा आपल्याला हिंदी सिनेमांमध्ये पाहायला मिळाला. जंजीर सिनेमा हिट ठरला आणि यानंतर सलीम-जावेद यांच्या लेखणीतून उतरलेल्या कित्येक व्यक्तिरेखा बिग बींनी आपल्या अभिनयाच्या सामर्थ्यावर जिवंत केल्या. त्यामुळे अमिताभच्या रुपात नवा स्टाईल आयकॉन तरुणाईला मिळाला.

 

याच दशकात गुलजार यांच्या लेखणीची धारही सिल्व्हर स्क्रीनवर उमटली...गीतकार, लेखक, दिग्दर्शक म्हणून त्यांनी स्वत: वेगळं अस्तित्व हिंदी सिनेसृष्टीमध्ये निर्माण केलं. सत्तरच्या दशकातच बासू चॅटर्जी आणि हृषिकेश मुखर्जी .या दोघांच्याही सिनेमात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे या दोघांच्याही सिनेमातून सामान्य माणसाचं प्रतिबिंब प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर दिसलं. या दोन दिग्दर्शकामुळेच अमोल पालेकर हे मराठमोळं नाव हिंदी सिनेसृष्टीमध्ये झळाळलं....आणि अमोल पालेकरांना छान साथ लाभली ती उत्पल दत्त यांची.

तर अभिनेत्रींमध्ये हेमामालिनी, जया भादुरी, रेखा, राखी, स्मिता पाटील या प्रतिभावंत अभिनेत्रींनी आपली चुणूक दाखवली...तर झीनत अमान आणि परवीन बाबीच्या रुपात मादक अभिनेत्री सिनेसृष्टीला मिळाल्या.

 

याच काळात मनमोहन देसाई, यश चोप्रा, यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पैलू  सिनेसृष्टीमध्ये पडले. सत्तरच्या दशकातच कपूर खानदानाचा नवा चेहरा आपल्याला सिल्व्हर स्क्रीनवर दिसला...ऋषी कपूर यांनी दमदारपणे सिल्व्हर स्क्रीनवर आगमन केलं.दाक्षिणात्य सिनेमाच्या माध्यमातून शिवाजीराव गायकवाडचा रजनीकांत झाला....तर याचवेळी कमल हसनही वेगवेगळे प्रयोग करताना दिसला....

 

असे अनेक कलाकार, त्यांचा अभिनय, त्यासाठी आवश्यक असलेलं दमदार कथानक या प्रवाहाबरोबरच संगीतामध्येही अनेक स्थित्यंतरं सत्तरच्या दशकात आपल्याला पाहायला मिळाली...आर डी बर्मन यांच्या सुरांची झंकार याच दशकात लोकप्रियतेच्या शिखरावर गेली...

 

मात्र 80 च्या दशकात हे चित्रं बदललं...ऐंशीच्या दशकात आर डी बर्मन यांच्याऐवजी बप्पी लहरी यांच्या संगीताची जादू दिसली बप्पीदांनी मेलडीअस गाण्यांएवजी डिस्को म्युझिकचा वापर अधिक केला आणि त्यांचं हे वेगळेपण तरुणाईला आवडलं...बप्पीदांच्या याच धूनवर बेभानपणे ताल धरला तो मिथुन चक्रवर्तीने...80 च्या दशकात या डान्सिंग स्टारचा जन्म झाला...

 

याच दशकात कौटुंबिक आणि रोमण्टिक सिनेमांची चलती होती. जितेंद्र, श्रीदेवी, जयाप्रदा, कादर खान यांसारख्या कलाकारांचं वर्चस्व हिंदी सिनेमात दिसलं.याच दशकात रोमान्सची नवी परीभाषा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळाली. याच दशकात शोमन  सुभाष घई यांनी सिल्व्हर स्क्रीनचा कॅनव्हास अधिक समृद्ध केला. सिनेमात भव्यता आणली.. त्यांच्या सिनेमात कथानकाइतकंच महत्व संगीतालाही देण्यात यायचं. तर जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि गोविंदा यांचा टपोरी अंदाज  बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाला...

 

तर नाना पाटेकरनेही आपला मराठी बाणा सिनेसृष्टीला दाखवून दिला. 70 आणि 80 च्या दशकातील या व्यावसायिक सिनेमांसह समांतर सिनेमानेही सिनेसृष्टीचा एक कोपरा व्यापला..श्याम बेनेगल आणि गोविंद निहनाली या काळाच्य

Tags: