ठाकूर यांच्यापाठोपाठ राम कदमांचीही शरणागती

सूर्यवंशी मारहाण प्रकरणी बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्यापाठोपाठ मनसेचे आमदार राम कदम यांनीही पोलिसांसमोर शरणागती पत्करलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 21, 2013, 11:07 AM IST

www.24taas.com, मुंबई
सूर्यवंशी मारहाण प्रकरणी बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्यापाठोपाठ मनसेचे आमदार राम कदम यांनीही पोलिसांसमोर शरणागती पत्करलीय.
सकाळी सुमारे १०.३० च्या सुमारास ठाकूर आणि कदम हे दोघेही आमदार पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एपाय सचिन सूर्यवंशी यांनी आपल्याला राम कदम यांनी मारहाण केल्याचं आणि गळा दाबून धमकी दिल्याचं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.

दरम्यान, बुधवारी विधिमंडळात हे प्रकरण गाजल्यानंतर या प्रकरणात पाच आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. निलंबित पाच आमदारांमध्ये मनसेचे राम कदम, बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जैयस्वाल आणि शिवसेनेचे राजन साळवी यांचा समावेश आहे. यावर एका गुन्ह्यासाठी दोन शिक्षा कशा, असा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेने न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय.