अकोला किडनी रॅकेट, औरंगाबादेतून दोन डॉक्टर ताब्यात

अकोला किडनी रॅकेट प्रकरणी आणखी दोन डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यत घेतलंय. हे दोन्ही डॉक्टर औरंगाबादच्या बजाज हॉस्पिटलचे असून अकोल्यात त्याची चौकशी सुरु आहे. 

Updated: Dec 5, 2015, 02:48 PM IST
अकोला किडनी रॅकेट, औरंगाबादेतून दोन डॉक्टर ताब्यात title=

औरंगाबाद : अकोला किडनी रॅकेट प्रकरणी आणखी दोन डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यत घेतलंय. हे दोन्ही डॉक्टर औरंगाबादच्या बजाज हॉस्पिटलचे असून अकोल्यात त्याची चौकशी सुरु आहे. 

गंभीर होत चाललेल्या या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाबाबत येत्या हिवाळी अधिवेशनात चर्चा केल्या जाईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलय. 

या प्रकरणाचा अहवाल मागवून त्यावर चर्चा केल्या जाणार असून भाजपचा कुठलाही कार्यकर्ता या प्रकरणात असल्यास त्याला पाठीशी घातल्या जाणार नाही. कडक कारवाई केली जाईल असही पाटील यांनी म्हटलय. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्तालयात रस्त्यांच्या कामासंदर्भातील आढावा घेण्यात आला.या बैठकीनंतर ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.