दिवाळी २०१५ : जाणून घ्या कधी आहे लक्ष्मी पूजनाचे शुभ मुहूर्त

 दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी संदर्भात अनेक कथा आहे. तसेच भारताच्या विविध भागात विविध पद्धतीने हा सण साजरा करण्यात येतो. पण लक्ष्मी पूजन हे सर्वत्र सारखेच केले जाते. 

Updated: Nov 11, 2015, 02:04 PM IST
दिवाळी २०१५ : जाणून घ्या कधी आहे लक्ष्मी पूजनाचे शुभ मुहूर्त title=

मुंबई :  दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी संदर्भात अनेक कथा आहे. तसेच भारताच्या विविध भागात विविध पद्धतीने हा सण साजरा करण्यात येतो. पण लक्ष्मी पूजन हे सर्वत्र सारखेच केले जाते. 

व्यापारी लोक या दिवशी चोपडी पूजन करतात. तर घरोघरी घरातील पैसे, दागिने आणि संपत्तीचे पूजन केले जाते. या दिवशी लक्ष्मी मातेचे पूजन करून घरात सुख समृद्धी आणि भरभराट राहण्याचे आवाहन केले जाते. 

अनेक जण आपल्या वेळेनुसार लक्ष्मी पूजन करतात. 

प्रदोष काळातील मुहूर्त 

लक्ष्मी पूजा मुहूर्त = 5:42 pm ते 7:38 pm
कालावधी = 1 Hour 55 mins
प्रदोष काल  = 5:25 pm ते 8:05 pm
वृषभ काल = 5:42 pm ते 7:38 pm

महानिषिद् काल मुहूर्त 
१० नोव्हेंबरच्या रात्रीपासून सुरू होतो. 

महानिषिद काल  = 11:38 pm ते  00:31 am
सिंह काल = 00:13 am ते  2:30 am

चोपडी - वही पूजा मुहूर्त 

सकाळचा मुहूर्त (लभ, अमृत) = 06:44 am ते 09:25 am
सकाळचा मुहूर्त (शुभ) = 10:45 am - 12:05 pm
दुपारचा मुहूर्त (चर, लभ) = 2:45 am  ते  5:26 pm
सायंकाळचे मुहूर्त (शुभ, अमृत, चर) = 7:06 pm - 11:16 pm

विशेष म्हणजे व्यापारी आणि घरातील लक्ष्मी पूजनासाठी प्रदोष काळातील मुहूर्त चांगला आहे. म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लक्ष्मी पूजन करावे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.