मोदी सरकार १०० दिवसः मोठ्या प्रवासाची सुरूवात

लोकसभा निवडणुकीत सतत चर्चेत असलेले नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली ती 15 ऑगस्ट रोजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या 'आऊट ऑफ द बॉक्स' भाषणावरून पुन्हा मोदी हे सर्वोत्तम असल्याचं दिसून आलं. नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीमत्वात पुन्हा आशावाद देशातील जनतेला दिसून आला.

Updated: Sep 2, 2014, 04:01 PM IST
मोदी सरकार १०० दिवसः मोठ्या प्रवासाची सुरूवात  title=

अक्रीता रेयार : लोकसभा निवडणुकीत सतत चर्चेत असलेले नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली ती 15 ऑगस्ट रोजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या 'आऊट ऑफ द बॉक्स' भाषणावरून पुन्हा मोदी हे सर्वोत्तम असल्याचं दिसून आलं. नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीमत्वात पुन्हा आशावाद देशातील जनतेला दिसून आला.

नरेंद्र मोदी यांनी 16 मे 2014 रोजी देशाचे पंधरावे पंतप्रधान म्हणून जेव्हा शपथ घेतली, तेव्हा सार्क देशातील गणमान्य व्यक्तींमध्येही नरेंद्र मोदी यांची वेगळीच छाप दिसून आली.

शपथविधीला सर्व प्रादेशिक नेत्यांसह आंतरराष्ट्रीय नेत्यांना निमंत्रणं पाठवल्याने एकाच दगडात दोन पक्षी मारल्यासारखं हे होतं. नरेंद्र मोदी यांच्या देशातील जनतेच्या अपेक्षेची आणि प्रगतीची रेषा ओळखतात हे मात्र निश्चित. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर देशात मोठे चांगले बदल होतील हे स्पष्ट होतं. मोदी हे नेतृत्व आता जागतिक पटलावर ओळखलं जाणार आहे, मोदी नेतृत्वाला मिळालेल्या प्रतिसादावरून हे नाव भारतातच नाही तर जागतिक स्तरावरही चर्चेत राहणार आहे हे देखील स्पष्ट आहे.

स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी पारंपरिक वेशभूषेत आणि फेट्यात भाषणासाठी आले. मोदींच्या भाषणातील मुद्दे आणि बुलेट ब्रुफ काचेचा बॉक्स न वापरता, केलेल्या भाषणामुळे पुन्हा मोदी चर्चेत आलं, नरेंद्र मोदी यांना विकासाचे मैलाचे दगड गाठाचे आहेत, हे त्यांच्या भाषणावरून दिसून आलं. भाषणातील मुद्यावरून नरेंद्र मोदी आणखी सर्वोत्तम करतील असं दिसून आलं.

नरेंद्र मोदी यांनी अतिशय आक्रमक पण हळूवारपणे महत्वाचे मुद्दे हाताळले. महिला भ्रुणहत्या, प्रशासन आणि मंत्रालयातील अंतर्गत वाद, गरीबी, स्वच्छता, शौचायलयांचं महत्व, मेड इन इंडिया ब्रँण्ड तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुरूषी मानसिकतेत बदल करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

नरेंद्र मोदी आपल्या अनोख्या शैलीमुळे ते भारतीय जनतेत लोकप्रिय होत आहेत, त्यांची ही लोकप्रियता अधिक वाढत जातेय. त्यांच्या बोलण्यातून सामान्य माणसाला खेचून आणण्याची ताकद दिसून येत आहे.

प्रशासन आणि राष्ट्रीय मुद्दा - एक नवी सुरूवात
नरेंद्र मोदी यांनी आपला नवा मंत्र ठेवला आहे, यात त्यांनी 'कमीत कमी सरकार आणि जास्तच जास्त प्रशासन'. नरेंद्र मोदी यांच्या केबिनेटमध्ये 23 मंत्री तर 22 राज्य मंत्री आहेत.

नरेंद्र मोदी यांनी कारभाराची सुत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या पाच दिवसात प्रत्यय आला. विशेष अधिकार असलेल्या मंत्री समूहाला मोदींनी बरखास्त केलं. विशेष म्हणजे त्यापुढील आठवड्यात नरेंद्र मोदी यांनी सर्व सचिवांशी चर्चा केली, त्यांना सांगितलं की, कोणताही मंत्री टाळा-टाळ करत असेल, त्यामुळे काम अडतंय, तर आपल्याला थेट सुचित करण्यात यावे, त्यासाठी त्यांना डायरेक्ट लाईन उपलब्ध करून देण्यात आली.

तसेच सर्वांना कामाची पद्धत सुधारण्यासाठी, वेळेचं नियोजन करण्यासाठी 11 सूचना देण्यात आल्या. तसेच 19 मुद्देही देण्यात आले, यात नोकरशहांनी राजकारणापासून दूर राहून, जनतेचा विकास कसा होईल, यावर लक्ष वेधण्यात आलं.

नरेंद्र मोदी यांनी चार स्थायी समिती रद्द केल्या आणि तसेच संसद सदस्यांना हजर राहण्याविषयी ताकीद देण्यात आली. यात हजेरी, कामकाजात सहभाग, यात चापलूसी संपवणे आणि पाय पडणे बंद करण्यास सांगण्यात आलं. मंत्रिमंडळातील सहभाग म्हणजे आराम करण्याची जागा नसून, खूप सारं काम करावं लागणार आहे, ज्यामुळे विकासाच्या चाकाला वेग येईल, असा सल्लाही देण्यात आला.

तसेच मंत्र्यांकडून 100 दिवसांचा एजेंडा देखिल मागून घेण्यात आला. शंभर दिवसात तुम्ही काय करणार आहात, याचं सादरीकरण करून दाखवा, असंही बजावण्यात आलं.

इराक संकटाच्या वेळी अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायेदशी आणण्यात आल्यानंतर, राष्ट्रीय स्तरावरील भाजप सरकार जागतिक स्तरावरही सक्षम असल्याचं दिसून आलं.

नेपाळमध्ये एक भूस्सखल झालं, एक शेजारील देश म्हणून तसेच बिहारमधील चार राज्यांच्या पूर परिस्थितीवर नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक लक्ष ठेवलं.

पर्यावरणाच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनी गंगा क्लिन अप प्रकल्प हातात घेतला आणि आपल्या मतदारसंघ वाराणसीचं पांग फेडण्याचा प्रयत्न केला. गंगा क्लीनअपसाठी काय करता येईल याचा अॅक्शन प्लान वर्षाच्या शेवटी पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

याआधी देखिल गंगा आणि यमुना या नदींच्या सफाईसाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले आहेत. यावर कोट्यवधी रूपयांचा यापूर्वी खर्च झाला आहे. गंगा क्लीन अपला यश आल्यास लाखो हिंदू आणि पर्यावरणावादी मोदींच्या या कामाची वाहवा निश्चित करतील.

आंतरराष्ट्रीय संबंध : मोदींची उपस्थिती उल्लेखनीय
ब्राझिलमधील सार्क समिटमध्ये मोदींची भेट चीनचे राष्ट्रपती झी जिंनपिंग, रशियाचे व्लादमीर पुतिन, दक्षिण आफ्रिकेचे जॅकेबा झुमा, ब्राझिलच्या डिलेमा रूसेफ यांच्याशी झाली. समिटमध्ये मोदींनी बिक्स देशांची दहा हजार अमेरिकन डॉलर्सची बँक स्थापना करण्याचा सल्ला दिला, या मुद्यावर चीनच्या पंतप्रधानांनी त्याचं हेडक्वॉर्टर शांगाईला असावं असा दावा केला.

मोदींचा खरा आंतरराष्ट्रीय दौरा हा भूतानपासून सुरू झाला. या दौऱ्यात त्यांनी प्रतिकात्मक संदेश दिले. मोदींनी त्यांच्या भूतान संसदेतील भाषणात चुकून दोन वेळेस भुतान ऐवजी नेपाळ म्हटलं. यानंतर मात्र त्यांनी हिंदीतच बोलणं पसंत केलं.

शेजारील राष्ट्र नेपाळ दौऱ्यात नरेंद्र मोदी यांच्या हातात काहीच लागलं नाही असं म्हणता येणार नाही. नेपाळ दौऱ्यात हायवेसाठी 100 कोटी रूपये देऊन चीनला शह दिला. तसेच पशुपतीनाथाच्या मंदिराला भेट देऊन खऱ्या अर्थाने नेपाळच्या हिंदूंची मनं जिंकली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सध्या जपान दौरा सुरू आहे. जपानशी त्यांचे जुने संबंध आहेत कारण यापूर्वीही काही जपानचे नेते अहमदाबाद दौऱ्यावर येऊन गेले आहे.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांचा पुढील महिन्यात अमेरिका दौरा होणार आहे, मोदींना याआधीच व्हाईट हाऊसचं बोलावणं आलं आहे. यावेळी हे मात्र विसरता येणार नाही की, अमेरिकेने नरेंद्र मोदी यांना 2002 साली गुजरात दंगलीतील कथित भूमिकेवरून दौरा नाकारला होता. अमेरिकन राज्याचे सचिव जॉन केरी यांनी मोदींचं इलेक्शन स्लोगन ऐकलं होतं, सबका साथ-सबका विकास, या स्लोगनचं केरी यांनी कौतुक केलं होतं.

उद्योग आणि तंत्रज्ञान 
भाजप सत्तेत येणार याची कुणकुण शेअर बाजाराला लागल्यापासून शेअर बाजाराला उधाण येण्यास सुरूवात झाली होती. नरेंद्र मोदी यांचं उद्योग प्रेम पाहून ते या क्षेत्रासाठी काहीतरी नवीन करतील या अपेक्षेने शेअर बाजार फुलल्याचं बोललं जात आहे. मात्र नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री अरूण जेटली यांचा संजीवनी युनियन बजेट मात्र आकर्षित करणारा ठरू शकला नाही.

महागाई अजूनही अटोक्यात आलीय असं म्हणता येणार नाही, मोदी सरकार आलं मात्र महागाईवर नियंत्रणाची गरज बोलली जात आहे. कांद्याचे भाव नियंत्रण करणे या सरकारलाही जमलेलं दिसत नाही. साखरउद्योगात सरकारने आयात शुल्क 15 ते 40 टक्के कमी केला. मात्र याचा फायदा ट्रेडर्सना झाला, गरीब शेतकऱ्यांना नाही.

सरकारने बजेट आधी रेल्वेची भाडेवाढ केली, हा बजेटचा भाग असल्याचं सांगितलं, यानंतर ही भाडे वाढ लांब पल्ल्यासाठी ठेवण्यात आली.
परदेशी एनजीओच्या राष्ट्रनिर्माणाच्या आणि राष्ट्रहिताच्या गोष्टींविरोधात काम करतायत, अशा देशभरातील बहुसंख्य परदेशी एनजीओंच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.

ये दिल मांगे मोर असं मोदी इस्त्रोच्या भाषणात म्हणाले यावरून मोदी यांच्या राष्ट्रविकासाचा दृष्टीकोन दिसून आला. याशिवाय तंत्रज्ञानाच्या मदतीनं ई-हेल्थ आणि डिजिटल इंडिया हे मोदींचं स्वप्न लोकांसाठी नवा आशावाद घेऊन आलं आहे.

शंभर दिवसातील वाद आणि वादाचे प्रसंग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरच्या सीमेला भेट दिली आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या बाजूने गोळीबार करण्यात आला. तसेच काश्मीर मुद्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सचिवांची होणारी चर्चा रद्द करण्यात आली. कारण यात हुर्रियतच्या नेत्यांनाही सहभागी कऱण्यात आलं होतं. हा सहभाग भारत सरकारला नको होता. पाकिस्तानने हुर्रियत नेत्यांना बोलवू नये असं भारत सरकारने बजावलं होतं. काही दिवसांपूर्वी दिल्लीत मोदी-शरीफ यांची भेट झाली. भेट साडी-शॉलमुळे गाजली.

आणखी एक राजकीय वादळ या शंभर दिवसात महत्वाचं ठरलं ते म्हणजे पंतप्रधान आणि पंतप्रधानाच्या कार्यक्रमादरम्यान जेव्हाही विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री व्यासपिठावर आले, तेव्हा भाषणावेळी कार्यकर्त्यांनी उडवलेली हुर्रे. पहिल्या प्रसंगाला पृथ्वीराज चव्हाण यांना सोलापुरात तोंड द्यावं. यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या भाषणावेळी पंतप्रधान स्टेजवर असतांना लोकांनी हुल्लळबाजी केली.

हुर्रे करण्याचं प्रकरण दोन ते तीन वेळेस झालं, मात्र मोदी यांनी आपण पंतप्रधान नसून प्रधानसेवक आहोत असं 15 ऑगस्टच्या भाषणात म्हटलं होतं, तसेच सहमतीने सरकार चालेल बहुमताने नाही, असं मोदींनी म्हटलं होतं, पण हुल्लळबाजीने हे साधता येईल का असा सवाल हुर्रे आणि हुल्लळजीमुळे उपस्थित झाला होता.

या दरम्यान काँग्रेसला विरोधी पक्षाचे नेतेपद दिलं जाणार नसल्याचं सांगण्यात आलं. लोकसभा अध्यक्षांनी तसे जुने दाखलेही दिले. मात्र काँग्रेस विरोधी पक्षांमध्ये सर्वात मोठा पक्ष असल्याने विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी काँग्रेसची आहे, सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे.

सध्या सर्वात पहिला आणि भाजपसाठी डोकेदुखीचा मुद्दा समोर येतोय. गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा पंकज सिंह यांनी बदलीसाठी पैसे मागितल्याचे आरोप होत आहेत. हे आरोप सत्य असले तर आपण राजकारण सोडू असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी सरकार यांचे हे पहिले शंभर दिवस म्हणजे हनीमून पीरेड असल्याचं म्हटलं जात होतं. पण सध्या तरी हा हनीमून व्यवस्थित पार पडल्याचं दिसतंय. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण सक्षम आणि योग्य दृष्टीकोन असलेले पंतप्रधान असल्याचं दाखवून दिलंय. याआधीही मोदी यांच्या वाटेत अनेक आव्हान, अडचणी आल्या आहेत, अहमदाबाद ते दिल्लीपर्यंत येण्याचा अनुभव आता पुढील काळात त्यांना कामी येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.