सरकारची उदासीनता लज्जास्पद?

अर्जुन डांगळे, (आरपीआय आठवले गट)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी आंदोलन करावं लागतं ही एक शरमेची आणि खेदजनक गोष्ट आहे. यासाठी केवळ आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली आहे, याची पण खंत वाटत आहे. बाबासाहेब केवळ दलित जनतेचे नाही ते सर्व भारताचे आहेत. त्यांच्यासाठी रिपाइं किंवा आंबेडकर चळवळीच्या लोकांनी आंदोलन करावे आणि इतरांनी गंमत पाहावी ही गोष्ट मनाला पटत नाही.

Dec 21, 2011, 11:44 AM IST

विकास कामे प्रशासनाने केली आहेत...

नियाज वणूमुंबई महापालिकेतील विकास कामांचे कोणत्याही एका पक्षाने श्रेय घेणं योग्य नाही. कारण या सर्व मोठ्या प्रकल्पांचे निर्णय प्रशासन घेत असतं. महापालिकेची एकही काम शिवसेना-भाजपच्या सदस्यांनी प्रस्तावित केलेलं नाही तर ते महापालिका आयुक्तांनी प्रस्तावित केलेलं आहे

Dec 19, 2011, 01:27 PM IST

अण्णा ओळखा, टीम अण्णांचा विळखा !

अनंत गाडगीळ भ्रष्टाचार ही या देशाला लागलेली किड आहे. शासनातील अधिकारी ते अनेक राजकारणी यामध्ये गुंतलेले आहेत. अशा लोकांना कॉंग्रेस कधीच पाठीशी घालणार नाही.

Dec 16, 2011, 01:06 PM IST

‘करून दाखवलं’

राहुल शेवाळे उद्धवजींच्या संकल्पनेतून वचननामा सिद्ध केला गेला. त्या वचननाम्यातून आम्ही जनतेला जी कामं करण्याचं वचन दिलं होतं, ती सर्व कामं आम्ही करून दाखवली आहेत. आणि या सर्वाची माहिती लोकांना व्हावी यासाठी करून दाखवलं, हे कॅम्पेन आम्ही चालवलंय.

Dec 14, 2011, 06:37 PM IST

पेडर रोडसाठी आम्ही बेडर.....

नितीन सरदेसाईपेडर रोड उड्डाणपूल.. हा विषय गेली दिवस चांगलाच गाजतो आहे.... मनसेची भूमिका याआधी ही स्पष्ट केली होती.. हा उड्डाणपूल झालाच पाहिजे. आणि यापुढेही तीच मागणी आम्ही लावून धरणार आहोत.

Dec 9, 2011, 10:28 AM IST

मोटारगाड्यांनी व्यापली मुंबापूरी

अशोक दातार देशात वाहतुकीचे धोरण निश्चित करताना ते कार केंद्रीत आहे. आज जगभरातील देश अधिकाअधिक लोकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करावा यावर भर देतात. त्यासाठी बस रॅपिड ट्रान्सिट सिस्टिमला (बीआरटी) प्राधान्यक्रम देतात. दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि चीनमध्ये तर ७९ शहरांमध्ये वाहतुकीसाठी ही व्यवस्था अवलंबण्यात आली आहे. रेल्वे प्रमाणे बसचा विचार करा असं सूत्र त्यामागे आहे.

Dec 8, 2011, 04:41 PM IST

सोशल नेटवर्किंग नव्हे... 'नॉटवर्किंग'

सचिन सावंतइंटरनेट आलं त्यांनी जगाचा चेहरामोहराच बदलून टाकला, क्षणार्धात एका ठिकाणाची बातमी दुसऱ्या ठिकाणी यासारख्या गोष्टी सहजपणे होऊ लागल्या. भारतात या सोशल मीडियावर काहीही बंधने नाहीत मात्र आक्षेपार्ह मजकूरावर बंधने आली पाहिजेत.

Dec 8, 2011, 12:54 PM IST

FDIमुळे बाजार उठणार का?

मॉल्स, सुपरमार्केट्समुळे यापूर्वीच स्थानिक व्यापारांच्या उद्योगांवर परिणाम झाला आहे. पण, ते सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर जाणवलं नाही. पण, यापुढच्या काळात खूप मोठी समस्या निर्माण हऊ शकते. सरकार काही मुद्द्यांचं विश्लेषण करत नाहीये. त्यांचा विचार करायलाच हवा.

Dec 1, 2011, 05:00 PM IST

रिटेलमधील गुंतवणुकीचे स्वागत करायला पाहिजे

भारतात थेट परदेशी गुंतवणूक वाढायला पाहिजे असं माझं मत आहे. आज चीनमध्ये 60 दशलक्ष डॉलर्सची परदेशी गुंतवणूक झाली आहे. त्या तुलनेत भारतात फक्त चार दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. जगाच्या एकूण गुंतवणुकी पैकी फक्त तीन ते चार टक्केच गुंतवणूक भारतात करण्यात येते. देशात मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक झाली तर व्यापाराला चालना मिळेल.

Nov 28, 2011, 04:24 PM IST

'हा मराठी माणसाचा अपमान'- सरनाईक

शरद पवार म्हणाले की माझे राजकीय वैर असू शकतं पण चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत माझे कुणाशीही वैयक्तिक वैर नाही. महाराष्ट्रात सर्वत्र या घटनेचा निषेध होतो. शिवसेनाप्रमुखांनीही पहिल्यांदाच बाहेर येऊन स्पष्ट शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे. महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाचा अपमान होणारी घटना दिल्लीत घडली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आहे. महाराष्ट्राला जेंव्हा मदतीची गरज भासते तेंव्हा दिल्लीत राज्याच्या समस्या सोडवणारे पवार हे एकमेव नेते आहेत.

Nov 25, 2011, 06:09 PM IST

कोण म्हणंत आघाडीत बिघाडी..?

महेश तपासे राणे-जाधव यांच्या वादामुळे आघाडीचे विरोधक भलतेच खूश झाल्याचे दिसून येत आहे.. आज अनेक ठिकाणी अश्या वावट्य़ा उठल्या आहेत की, आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे.

Nov 9, 2011, 07:43 AM IST

भास्कर जाधव जरा सबुरीनं....

निर्मला सामंत-प्रभावळकर राज्यात आजही आघाडी सरकारचं राज्य आहे. आणि हे सरकार अतिशय उत्तम प्रकारे प्रशासनाचा कारभार पाहत आहे. राणे-जाधव वाद ही नक्कीच गंभीर बाब आहे. पण अशाप्रकारे वादविवाद केल्याने आघाडी काही बिघाडी होईल असं मला वाटत नाही.

Nov 9, 2011, 06:34 AM IST

कोकणात ‘गुंडा’राज

सिंधुदुर्ग जिल्ह्यासारखं दहशतीचे वातावरण संपूर्ण राज्यात कोठेही नाही. मी एका उद्योजकाला सिंधूदुर्गात गुंतवणूक का करत नाही असं विचारलं तेव्हा ते म्हणाले की तिथल्या गुंडाराजमुळे भीती वाटते. मी संपूर्ण राज्यात फिरतो पण इतकी भयाण परिस्थिती कुठेही नाही.

Nov 8, 2011, 05:09 PM IST

दलाल स्ट्रीट की डल्ला स्ट्रीट

विश्वास उटगी दलाल स्ट्रीट ताब्यात घ्या! ही चळवळ येत्या शक्रवारी ४ नोव्हेंबर २०११ रोजी सुरु होणार आहे. अमेरिकेतील वॉल स्ट्रीट ताब्यात घेण्याच्या धर्तीवर भारतातही ही चळवळ सूर करत आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव प्रकाश रेड्डी आणि त्याला महाराष्ट्र स्टेट बँक एम्फ्लॉईज फेडरेशनने (एमएसबीईएफ) पाठिंबा दिला आहे. एमएसबीईएफ ही ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोशिएशनची संलग्न फेडरेशन आहे.

Nov 8, 2011, 04:44 PM IST

अण्णा आंदोलन फक्त सवंग प्रसिद्धीसाठीच का?

अजित सावंत अण्णांचा ब्लॉग वरूनही राजकारण होऊ शकतं याचंच आश्चर्य मला वाटतं, कारण की आजवर टीम अण्णा आणि स्वत: अण्णा या दृष्टचक्रात अडकतच चालले आहेत. आजवर त्यांच्या टीमची नवनवीन बाहेर येणारी प्रकरण आणि तसतसे त्यांचा आंदोलनापासून दूर जाणारे अण्णा. यांमुळे सामान्याचा मनात घर करणारे अण्णा मात्र याच सामान्यांचा रोषाला लवकरच सामोरे जातील असं वाटतं.

Nov 7, 2011, 06:44 PM IST

सकारात्मक प्रांतवाद असावा...

दीपक पवारराजकीय विश्लेषक निरुपमसारख्या नेत्यांबद्दलच बहुतेक तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय ‘तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा’. पण, महाराष्ट्रातल्या पक्षांनी प्रांतवादाचं प्रतिक्रियात्मक राजकारण थांबू नये. यापलीकडे जाऊन त्यांना मराठी भाषेसाठी सकारात्मक राजकारण करावं लागेल.

Nov 3, 2011, 06:24 PM IST

निरुपमच्या तोंडाला मी काळं फासणारच...

विनोद घोसाळकर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे. कारण माझ्या पदापेक्षा मला नेहमीच मराठी स्वाभिमान हा मला हजारपटीने जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण, मी हाडाचा शिवसैनिक आहे. हे संजय निरुपमने लक्षात ठेवावं.

Nov 2, 2011, 06:13 PM IST

छटपूजा की राजकारण

राम कदम गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर भारतीय नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वादंग माजलेला आहे. त्या संदर्भात राज ठाकरे योग्य वेळ येताच आपल्या खास आक्रमक पद्धतीनं आपलं मत लोकांसमोर मांडतील.

Nov 2, 2011, 06:00 PM IST

'काँग्रेस हा गेंड्याच्या कातडीचा पक्ष'

अतुल भातखळकर काँग्रेस या पक्षाने देशाचे कधीच भलं तर केलं नाहीच पण तसा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना देखील सोयीस्कररित्या बाजूला केलं. गेंड्याची कातडी असलेला आणि ज्याच्यामुळे देशाला किड लागली आहे असा हा पक्ष आहे. काँग्रेसने सत्तेत अडसर ठरणाऱ्यांना पध्दतशीरपणे दूर सारलं.

Oct 26, 2011, 12:03 PM IST

कार्यक्रम पालिकेचा, चेहरामोहरा सेनेचा

महादेव शेलार कार्यक्रम पालिकेचा, चेहरामोहरा सेनेचा, असचं सध्या मुंबईत दिसून येत आहे. याला काय म्हणायचे ? आता इलेक्शन फेब्रुवारी २०१२मध्ये आलयं, म्हणून हा उद्धाटनाचा सपाटा सुरू झाला आहे. सत्ता शिवसेनेची. पाच वर्षे हे झोपले होते का ?

Oct 26, 2011, 08:34 AM IST