‘मिक्टा-२०१३’- नानानं केलं शरद पवारांचं कौतुक

By Aparna Deshpande | Last Updated: Monday, September 30, 2013 - 10:08

www.24taas.com, झी मीडिया, मकाऊ
मकाऊमध्ये यंदाचा ‘मिक्टा-२०१३’ पुरस्कार सोहळा रंगतोय. सुमारे तीनशे कलाकार मकाऊमध्ये दाखल झालेत. यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता नाना पाटेकर आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना गर्व महाराष्ट्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय.
हा सोहळा सुरू होण्यापूर्वी कलाकारांनी जोरदार प्रॅक्टीस केली. तर परदेशात सगळे कलाकार एकत्र आल्यानं हा एक छान आनंद सोहळा असल्याची भावना अभिनेता नाना पाटेकरनं व्यक्त केली.
दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते नानाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नानानं शरद पवार यांच्या लढवय्या व्यक्तीमत्वाचं भरभरून कौतुक केलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, September 30, 2013 - 10:08
comments powered by Disqus