अनुष्का शर्माला विराटचा विरह सहन झाला नाही आणि...

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, February 6, 2014 - 19:41

www.24taas.com,वृत्तसंस्था, ऑकलंड
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या अफेअरची सध्या चर्चेचा धुरळा बसला असतानाच आता नव्या प्रकारणानंतर जोर धरू लागली आहे. ऑकलंडमध्ये दोघेही हातात हात घालून फिरताना ट्विटरवर फोटो प्रसिद्ध झालाय. त्यामुळे तुम्ही याचा अर्थ काय काढायचा तो ठरवा.
आम्ही केवळ मित्र आहोत, असा अनुष्का दावा करीत असली तरी काहीच दिवसांपूर्वी न्यूझीलंडमध्ये जे पाहायला मिळालं, त्यावरुन तर असंच वाटतंय की या दोघांमध्ये कुछ कुछ है, असं वाटू लागलं आहे.
ऑकलंडमध्ये न्यूझीलंड आणि भारत या दोन्ही संघात कसोटी सामना सुरू आहे. विराट कोहलीचा पण संघात समावेश आहे. मात्र, विराटला भेटण्यासाठी बिझी शेड्यूलमधून वेळ काढून अनुष्का न्यूझीलंडमध्ये पोहोचली आणि...ज्यावेळी अनुष्का आणि विराट एकमेकांच्या हातात हात घालून `वॉक अँड टॉक` करत होते. हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला गेलाय.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी विराट मुंबईतील अनुष्का शर्मा हिच्या घरातून बाहेर पडताना अनेकांनी पाहिलं होतं. त्यावेळी अनुष्काने आमचं तसं काही नाही, असं स्पष्टीकरण केलं. आम्ही फक्त चांगले फ्रेण्ड्स आहोत. मी त्याला शॅम्पूच्या शूटदरम्यान भेटले होते. तेव्हा विराट कूल असल्याचं कळलं. आम्ही तीन दिवस एकत्र शुटिंग केलं. शुटिंगच्या दुसऱ्या दिवशी मी माझ्या घरी मित्र-मैत्रिणींसाठी पार्टी ठेवली होती आणि विराटलाही बोलावलं होते, बस इतकंच होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 6, 2014 - 19:41
comments powered by Disqus