धूम-३ : बिकिनी ट्रेण्ड आणि कतरिनाचा जलवा

सिनेमाची सिरीज म्हटली की त्यात काहीना काहीतरी नवीन हे असंतच.. मात्र, तरीही सिनेमातली एखादी गोष्ट ही सिनेमाचा युएसपी असते आणि तोच ठरतो सिनेमाच्या सिरीजचा ट्रेण्ड. असाच बिकिनी ट्रेण्ड धूमच्या तिस-या सिरीजमध्येही पाहायला मिळतोय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 21, 2013, 01:29 PM IST

ww.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सिनेमाची सिरीज म्हटली की त्यात काहीना काहीतरी नवीन हे असंतच.. मात्र, तरीही सिनेमातली एखादी गोष्ट ही सिनेमाचा युएसपी असते आणि तोच ठरतो सिनेमाच्या सिरीजचा ट्रेण्ड. असाच बिकिनी ट्रेण्ड धूमच्या तिस-या सिरीजमध्येही पाहायला मिळतोय.
धूम-३ सिनेमाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे.. आमिर खान जसं सिनेमाचं आकर्षण आहे तसंच कतरिना कैफचा बिकीनी अवतारसुद्धा धूम-३चं आकर्षण ठरतंय. धूम च्या याआधीच्या सिरीजमध्येही बिकिनीचा हा ट्रेण्ड पहायाल मिळाला होता.. धूममध्ये इशा देओलने त्यासाठी खास ट्रेनिंग घेतलं होतं.. तर धूम-२ मध्ये ऐश्वर्या राय आणि बिपाशा बासूही. बिकीनीसाठी स्लीमट्रीम झाल्या होत्या आणि आता याच बिकीनी ट्रेण्डमध्ये दिसणार आहे कतरिना कैफ.
धूम-३मधून कतरिना हटके लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यासाठी तिने स्पेशल ट्रेनिंग घेतलंय. एवढचं नाही तर जवळपास दीड तास वर्कआऊटही केलंय. आदीत्य चोप्रा कतरिनाला आजवर कधीही न पाहिलेल्या लूकमधून प्रेक्षकांसमोर आणतोय. तसं पाहता शिला की जवानीमध्ये कतरिनाने आपला कातिलाना अंदाज दाखवला होताचं. तेव्हा पुन्हा कतरिनाचा हा सेक्सी अँण्ड हॉट लूक कसा असणार याची उत्सुकता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ