तब्बल महिन्याभरानंतर शत्रुघ्न सिन्हा घरी

गेल्या महिन्याभरापासून मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना आता डिस्चार्ज मिळालाय. पत्नी पुनमसोबत ते घरी परतले आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 13, 2012, 05:23 PM IST

www.24taas.com, मुंबई
गेल्या महिन्याभरापासून मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना आता डिस्चार्ज मिळालाय. पत्नी पुनमसोबत ते घरी परतले आहेत.
अभिनेते आणि भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांना रविवारी अंबानी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. ६६ वर्षीय शत्रुघ्न सिन्हा यांना २ जुलै रोजी श्वासाच्या त्रासामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. घराला पेंटींग सुरु असताना सिन्हा यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवून लागला होता.
यानंतर, १६ जुलै रोजी सिन्हा यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती त्यामुळे पुढचे दोन दिवस ते आयसीयूमध्ये होते. आता मात्र सिन्हा यांची तब्येत सुधारली असल्याचं कोकिलाबेन हॉस्पिटलचे सीओओ डॉ. राम नारायण यांनी सांगितलंय. रविवारी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आलीय. सर्जरीनंतर १०-१२ दिवसानंतर ते घरी जाऊ शकत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं पण सिन्हा यांनी मात्र हॉस्पिटलमध्येच राहण्यास पसंती दिली होती.