भारत X न्यूझीलंड : जडेजा फॉर्मात, मॅच टाय

शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार झालेली भारत आणि न्यूझीलंड ऑकलंड वन-डे अखेर टाय झाली. रवींद्र जाडेजानं नॉटआऊट ६६ रन्सची झुंजार इनिंग खेळत टीम इंडियाला मॅचमध्ये कमबॅक करून दिलं. मात्र, त्याला आपल्या टीमला चित्तथरारक मॅचमध्ये  विजय साकारून देता आला नाही.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 25, 2014, 07:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ऑकलंड
शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार झालेली भारत आणि न्यूझीलंड ऑकलंड वन-डे अखेर टाय झाली. रवींद्र जाडेजानं नॉटआऊट ६६ रन्सची झुंजार इनिंग खेळत टीम इंडियाला मॅचमध्ये कमबॅक करून दिलं. मात्र, त्याला आपल्या टीमला चित्तथरारक मॅचमध्ये  विजय साकारून देता आला नाही.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ऑकलंड वन-डे मॅचमध्ये अॅक्शन, ड्रामा आणि एक धमाकेदार क्लायमॅक्स क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाला. सीरिजमधील तिसऱ्या वन-डेत क्रिकेट चाहत्यांना अखेरच्या बॉलपर्यंत श्वास रोखून धरायला लावणारी मॅच अनुभवायला मिळाली.
ऑकलंड वन-डेत टीम इंडियासमोर न्यूझीलंडनं ३१५ रन्सचं आव्हानात्मक टार्गेट ठेवलं होतं. ३१५ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात धडाक्यात झाली होती. शिखर धवन आणि रोहित शर्मानं भारतीय टीमला ६४ रन्सची पार्टनरशिपही करून दिली होती. त्यामुळे टीम इंडिया तिसरी वन-डे जिंकली अशी आशा होती.
मात्र, शिखर धवन आऊट झाल्यानंतर भारताची इनिंग गडगडली. भारताची निम्मी टीम १४६ रन्सवरच पॅव्हेलियनमध्ये पतली होती. आर. अश्विन आणि कॅप्टन धोनीनं भारताला विजयाची अंधुकशी आशा दाखवली. त्यानंतर जाडेजानं अखेरच्या दोन ओव्हर्समध्ये चांगलीच रंगत निर्माण केली होती. शेवटच्या एका बॉलमध्ये भारताला विजयासाठी दोन रन्सची आवश्यकता होती. भारताला एक रन करता आला आणि ही मॅच टाय झाली. दरम्यान, न्यूझीलंडनं सीरिजमध्ये २-० नं आघाडी घेतली आहे. भारताकडे आता पाच वन-डे मॅचेसची सीरिज बरोबरीत साधण्याची नामी संधी आहे. 

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.