कोहलीचं शतक पूर्ण; धोनी मात्र एका धावेनं हुकला

नागपूर टेस्टचा तिसरा दिवस गाजवला तो टीम इंडिया कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि युवा स्टार बॅट्समन विराट कोहलीनं...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 15, 2012, 05:20 PM IST

www.24taas.com, नागपूर
नागपूर टेस्टचा तिसरा दिवस गाजवला तो टीम इंडिया कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि युवा स्टार बॅट्समन विराट कोहलीनं... दोघांनी पाचव्या विकेट्साठी १९८ रन्सची पार्टनरशिप केली. दोघांच्या खेळीमुळे भारताला मॅचमध्ये कमबॅक करता आला. दुसऱ्या दिवसाच्या ४ आऊट ८७ अशा नाजूक अवस्थेतून दोघांनी भारताला सुस्थित पोहचवलं. विराट कोहलीनं १०३ रन्सवर आऊट झाला तर धोनीनेही ९९ रन्सची जिगरबाज खेळी केली. त्याची सेंच्युरी मात्र एक रननं हुकली. ९९ रन्सवर तो कूकच्या थेट फेरीवर रनआऊट झाला.
आजच्या दिवसाच्या महत्त्वाच्या घडामोडी
महेद्रसिंग धोनीनंतर लगोलग पियुष चावलाही बाद झालाय. ही भारताची आठवी विकेट... चावला दोन बॉलमध्ये अवघा एक रन देऊन बाद झालाय. भारताची सध्याची स्थिती २९७/८ अशी आहे.
भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंगचं शतक अवघ्या एका धावेनं हुकलंय. तो ९९ रन्सवर आऊट झालाय. ही भारताची सातवी विकेट ठरली. धोनीनं २४६ बॉ्ल्समध्ये ९९ रन्स केले. आता मैदानावर आर. अश्विन आणि पियुष चावला खिंड लढवत आहेत.
याअगोदर विराट कोहलीने नागपूर कसोटीत दमदार शतक ठोकल्यानंतर कोहलीही बोल्ड झालाय. २९५ बॉल्समध्ये १०३ रन्स करत त्यानं टेस्ट करिअरमधलं आणखी एका शतक झळकावलंय. या शतकात ११ चौकारांचा समावेश आहे. विराट बाद झाल्यानंतर धोनीला साथ देण्यासाठी रवींद्र जडेजा मैदानावर दाखल झालाय.
इंग्लंाडला चोख प्रत्युकत्तर दिलंय. कोहलीने कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत पावणेदोनशे धावांची अभेद्य भागीदारी करुन भारताचा डाव अडचणीतून बाहेर काढला. कोहलीने अतिशय संयमी खेळी केली. नेहमीपक्षा ही खेळी अतिशय जबाबदारीने परिपूर्ण होती.
कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी भारताची बाजू सावरली आहे. पहिल्या तीनही मॅचमध्ये अपयशी ठरलेल्या विराट कोहलीने उपहारानंतर अर्धशतक पूर्ण केले. आणि त्याला धोनीनेही चांगलीच साथ दिली. मात्र स्कोरबोर्डं अगदीच संथ गतीने हलतो आहे. त्यामुळे अजूनही टीम इंडियाची नामुष्की टळलेली नाही.
धोनीसोबत कोहलीने चांगली भागीदारी केली आहे. दोघांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली असून फॉलोऑन टाळला आहे. उपहाराला खेळ थांबला त्याअवेळी भारताची 4 बाद 146 अशी स्थिती होती. सर्वात महत्त्वाचे म्ह णजे पहिल्या सत्रामध्येर भारताने एकही विकेट गमाविली नाही. ही भागीदारी आणखी वाढविण्यातचा दोघांचा प्रयत्नल राहणार आहे.
इंग्लडच्या ३३० धावांचा पाठलाग करताना अवघ्या झटपट बाद झालेल्या चार फलंदाजामुळे भारतीय संघ चौथ्या आणि अंतीम कसोटीत अडचणीत आला आहे. सध्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून विराट कोहली ११ आणि कर्णधार धोनी ८ धावांवर खेळत आहे.
यापूर्वी भारताचे ७१ धावांवर भारताचे चार आघाडीचे फलंदाज तंबूत गेले आहे. सचिन तेंडुलकर २, सेहवाग शून्य गंभीर ३७ आणि पुजारा २६ धावा काढून बाद झाला.
गंभीर, सेहवाग आणि सचिनचा अडसर अंडरसनने दूर केला. सचिन आणि सेहवाग दोन्हीही त्रिफळाचित झाले. तर गंभीरने अंडरसनच्या गोलंदाजीवर प्रायरकडे झेल दिला. चेतेश्वर पुजारा पंचाच्या चुकीच्या निर्णयचा बळी ठरला. त्याच्या हाताला चेंडू लागला असताना मनगटाला लागल्याचे समजून त्याला बाद ठरविण्यात आले. पुजाराची विकेट स्वानने घेतली.
भारताला एक धावेवर पहिला झटका बसला. वीरेंद्र सेहवाग शून्यावर जिमी अंडरसन याचा शिकार झाला. सेहवागला अंडरसनने त्रिफळाचित केले.