दोन टेस्टसाठी आज निवड, सेहवागचं काय होणार?

Last Updated: Thursday, March 7, 2013 - 11:31

www.24taas.com, मुंबई
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन टेस्टसाठी टीम इंडियाची आज निवड होणार आहे. सध्या खराब फॉर्मात असलेल्या वीरेंद्र सेहवागच्या भवितव्याबाबत निवड समिती काय निर्णय घेते याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.
या सीरिजमध्ये सेहवागला अवघे २७ रन्सच करता आले आहेत. मागच्या १० टेस्टमध्येही त्यानं केवळ २८ च्या सरासरीनं रन्स केले आहेत. विशेष म्हणजे मागच्या ९ इनिंगमध्ये त्याला एकदाही हाफ सेंच्युरी झळकवता आलेली नाही. या खराब फॉर्ममुळे सेहवागची टीममधून सुट्टी होऊ शकते.
वीरेंद्र सेहवागच्या जागेवर त्याचा दिल्लीकर साथीदार गौतम गंभीरची निवड होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळेस माजी कसोटीपटू राहुल द्रविड याने सेहवागच्या निवडीबाबत वक्तव्य केलं आहे. सेहवागची कारकिर्द पाहूनच त्याबाबत निर्णय घेतला जावा असा सल्लाही त्याने निवड समितीला दिला आहे.First Published: Thursday, March 7, 2013 - 11:24


comments powered by Disqus