वसीम अक्रमची सनीराने काढली विकेट

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, August 22, 2013 - 13:29

www.24taas.com, झी मीडिया, लाहोर
पाकिस्तानचा फास्टर बॉलर वसीम अक्रमने आपली ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंड सनीरा थॉमसन हिच्याशी विवाह बंधनात अडकला. याबाबत पाकिस्तानमधील वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्युनने वृत्त दिले आहे. तसेच निकाहचा फोटोही प्रसिद्ध केला आहे.
वसीम अक्रम आणि सनीराचा निकाह गेल्या आठवड्यात लाहोरमध्ये पार पडला. हा विवाह सोहळा साधा होता. माझ्यासाठी हा निकाह महत्वपूर्ण आहे. माझी पत्नी, माझी मुलं आणि माझ्यासाठी नवीन जिंदगी आहे. निकाह होण्याआधी सनीरा हिने इस्लाम धर्म स्वीकारल्याची माहिती अक्रम यांने दिली.
४७ वर्षीय अक्रम याची पत्नी हुमा हिचा २००९ मध्ये कॅन्सरने मृत्यू झाला होता. त्यानंतर वसीमचे नाव भारतीय बॉलिवूड अभिनेत्री सुश्मीता सेन हिच्याशी जोडले गेले होते. मात्र, सनीराशी कबुल करून ही चर्चाच होती ते सिद्ध केले. सनीरा हिचे वय ३० वर्ष आहे. ती आजपर्य़ंत ऑस्ट्रेलियात एका जनसंपर्क कार्यालयात काम करत होती.
सनीरा याच महिन्यात कराचीत दाखल झाली. त्यानंतर ती अक्रमच्या आजारी वडिलांसाठी बघण्यासाठी ती लाहोरला गेली. त्यानंतर एका साध्या पद्धतीने दोघांचा निकाह पार पडला. तिने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. ती आता उर्दु शिकणार आहे. सनीरा माझ्या पहिल्या पत्नीच्या मुलांचा सांभाळ चांगली करेल, असा अक्रमन विश्वास व्यक्त केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 22, 2013 - 13:04
comments powered by Disqus