युवराजनंतर आता त्याचे वडिलही झगडतायत कॅन्सरशी

क्रिकेटर युवराज सिंह हा दोन वर्षांपूर्वीच कॅन्सरशी दोन हात करून सुखरुप बाहेर पडलाय. पण, आता त्याचे वडील योगराज सिंह यांनाही कॅन्सर झाल्याचं निदान झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 6, 2014, 06:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
क्रिकेटर युवराज सिंह हा दोन वर्षांपूर्वीच कॅन्सरशी दोन हात करून सुखरुप बाहेर पडलाय. पण, आता त्याचे वडील योगराज सिंह यांनाही कॅन्सर झाल्याचं निदान झालंय.
योगराज यांना घश्याचा कॅन्सर आहे, अशी माहिती मिळतेय. ट्युमर काढून टाकण्यासाठी त्यांना न्यूयॉर्कच्या एक हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. इथं त्यांच्यवर एक शस्त्रक्रियाही पार पडलीय. त्यांना सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलंय.
56 वर्षीय माजी कसोटीपटू योगराज यांच्या ‘वोकल कॉर्ड’मध्ये काही महिन्यांपूर्वी कॅन्सर असल्याचं लक्षात आलं होतं. यानंतर ते न्यूयॉर्कमध्येच डॉक्टरांच्या सल्ल्यावरून औषधं घेत होते. परंतु, त्यानंतर मात्र त्यांचा घसा बंद झाला आणि श्वासोच्छावास घेणंही त्यांना जड जाऊ लागलं... खोकला वाढलं... त्यांतर मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
योगराज यांनी कुटुंबीयांना अगोदर आपल्या आजाराविषयी काहीच कळू दिलं नव्हतं... परंतु, जेव्हा त्रास वाढला तेव्हा त्यांनी याबद्दल कुटुंबीयांसमोर वाच्यता केली, असं योगराज यांची पत्नी सतवीर कौर यांनी म्हटलंय. युवराजवर ज्या हॉस्पीटलमध्ये केमोथेरपी करण्यात आली होती त्याच हॉस्पीटलमध्ये योगराज यांच्यावर उपचार सुरु आहेत. योगराज सिंह यांनी फरहान अख्तर फेम 'भाग मिल्का भाग' या चित्रपटात कोचची भूमिकाही साकारली होती.
युवराजलाही 2001 मध्ये कॅन्सर झाल्याचं लक्षात आलं होतं. केमोथेरपीच्या शेवटच्या सेशननंतर मार्च 2012 मध्ये त्याला हॉस्पीटलमधून सुट्टी मिळाली. त्यानंतर याच वर्षी युवराजनं मैदानावर पुन्हा जोरदार एन्ट्री केली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.