गौरवला मिळाली ११ हजारांची मदत

ल्गेरियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऍरोबिक जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या औरंगाबादमधील गौरव जोगदंड याला शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी अकरा हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

Updated: Feb 23, 2012, 01:27 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद 

 

बल्गेरियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऍरोबिक जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या औरंगाबादमधील गौरव जोगदंड याला शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी अकरा हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

 

 

बल्गेरियात होणाऱ्या बाराव्या आंतरराष्ट्रीय ऍरोबिक जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी गौरवची निवड झाली आहे. मात्र पैशांअभावी गौरवला ही संधी हुलकावणी देते की या अशी परिस्थिती आहे...या दौऱ्यासाठी गौरवला ८० हजार रुपये लागणार आहेत.  गौरवचे वडिल अविनाश जोगदंड हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपण गरिब असलो तरी आपल्या मुलाने मोठे जिम्नॅस्टिकपटू व्हावे आणि देशाचे नाव उंचवावे अशी त्याच्या पालकांची इच्छा आहे.

 

 

गौरवनंही राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राला गोल्ड मेडल मिळवून दिलंय. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाकरता मेडल मिळवून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा चंग त्यानं बांधला आहे. झी २४तासने याबाबतचं वृत्त दाखवल्यानंतर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्याला आर्थिक मदत जाहीर केली आहे.