रायगडवर शिवरायांच्या शौर्याचे नवे पुरावे

शिवरायांची शौर्यगाथा सर्वांनाच माहिती आहे. पण त्याच शौर्याची साक्ष देणारे पुरावे पुरात्तत्त्व विभागाला रायगडावर सापडलेत. शिवरायांच्या राज्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि वेगवेगळ्या शस्त्रांचे अवशेष रायगडावरच्या साफसफाई दरम्यान हाती लागले आहेत.

Updated: Apr 11, 2012, 01:04 PM IST

भारत गोरेगावकर, www.24taas.com, रायगड

शिवरायांची शौर्यगाथा सर्वांनाच माहिती आहे. पण त्याच शौर्याची साक्ष देणारे पुरावे पुरात्तत्त्व विभागाला रायगडावर सापडलेत. शिवरायांच्या राज्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि वेगवेगळ्या शस्त्रांचे अवशेष रायगडावरच्या साफसफाई दरम्यान हाती लागले आहेत.

किल्ले रायगड ही शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी.स्वराज्याचा संपूर्ण गाडा रायगडावरून हाकला जायचा. शिवरायांचं सर्वाधिक वास्तव्य असलेल्या रायगडाची सध्या पुरातत्त्व विभागाकडून साफसफाई सुरू आहे. या दरम्यान रायगडावर काही बहूमोल अशा ऐतिहासिक वस्तू सापडल्या. दगडी जाते, दगडी मूर्ती, दगडी पणत्या, छोटेमोठे तोफगोळे, भाले, खंजीर, कट्यारीसारख्या शस्त्रांच्या दुर्मिळ अवशेषांचा त्यात समावेश आहे.

हा ऐतिहासिक ठेवा पुरातत्त्व विभागानं सुरुक्षित ठेवलाय. त्याचं जतन कसं करता येईल, यावर सध्या अभ्यास सुरू आहे. मात्र,  हा ठेवा रायगडावर पहाता यावा आणि त्यासाठी योग्य व्यवस्था करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे. वेळोवेळी सापडत जाणारा हा दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा, खरं तर जतन करण्याची खरी गरज आहे. शिवाजी पुतळा, स्मारकावरून सोईस्कर राजकारण करणारे नेते या दुर्मिळ ऐवजाला महत्त्व देतील का ? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय.