धरण उशाला, कोरड घशाला !

मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी आणि जास्तीत जास्त जमीन ओलीताखाली आणण्याच्या उद्देशातून, ११ उच्च पातळी बंधारे बांधण्यात आले.

Updated: Oct 5, 2012, 12:05 AM IST

www.24taas.com, औरंगाबाद
मराठवाड्यात सिंचनाचे तीन तेरा !
११ बंधा-यांवर २५०० कोटींचा खर्च !
बंधा-यांत मात्र पाण्याची बोंब !
नेमका कुठे झिरपला पैसा ?
धरण उशाला कोरड घशाला !

मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी आणि जास्तीत जास्त जमीन ओलीताखाली आणण्याच्या उद्देशातून, ११ उच्च पातळी बंधारे बांधण्यात आले...खरंतर पाच वर्षापूर्वी म्हणजे २००७ साली तो खर्च केवळ २०० ते ३०० कोटी रुपये इतका होता...पण पुढच्या पाच वर्षात तो खर्च चक्क पंचवीसशे कोटी रुपयांवर जाऊन पोहोचलाय.... गोदावरी नदी....मराठवाड्याची जीवनदायनी ....मराठवाड्यात सिंचन वाढवण्यासाठी मराठवाडा पाटबंधारे विभागाने या नदीवर ११ बंधारे बांधले आहेत...आणि त्यासाठी तब्बल २५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला...पण अद्यापही ना जनतेची तहान भागलीय ना शेतीला पाणी मिळालंय... त्यामुळे मराठवाडा अद्यापही तहानलेलाच आहे..मराठवाड्यातील सिंचनाच्या या अवस्थेला सिंचन विभागातील भ्रष्टाचार आणि अनागोंदी जबाबदार असल्याचा आरोप आता होवू लागला आहे...
पाच वर्षापूर्वी म्हणजेच २००७ साली मराठवाड्यातील गोदावरी नदीवर ११ बंधा-यांचा एकून खर्च २०० ते ३०० कोटी रुपयांच्या घरात होता...मात्र तो २०१२ मध्ये थेट २५०० कोटी रुपयांवर जाऊन पोहोचलाय.. ज्या वेगाने या ११ बंधा-यांचा खर्च वाढलाय तो सोन्यालाही मागे टाकणारा ठरला आहे...बंधा-याच्या खर्चाने कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली आहेत...बंधा-याचा खर्च वाढण्यामागे काही महत्वाची कारणं आहेत... ज्या ठिकाणी के.टी.वेअर अर्थात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणं कसं बसं शक्य होतं तिथ मोठ्या बंधा-यांचा घाट घालण्यात आल्याचा आरोप केला जातोय़.... मराठवाडा सिंचन विकास महामंडळाने बांधललेल्या या ११ बंधा-यांपैकी एकाही बंधा-याचं शंभर टक्के पूर्ण झालं नाही...त्यामुळे बंधा-यात पाणी किती आडवलं गेला या प्रश्नाच उत्तर केवळ सिंचन विभागचं देवू शकतं....

हे सगळे बांधरे बांधून पूर्ण होण्यासाठी अद्यापही २०० ते ३०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे... ११ बंधारे बांधतांना नदीच्या पाण्याचा विचार केला गेला नसल्याचा आरोप केला जातोय...गोदावरी नदीला पाणी नसतानाही त्यावर हे बंधारे बांधण्यात आल्याचा आरोप लोणीकर यांनी केलाय.. मराठवाडा सिंचन विकास महामंडळाने गोदावरी नदीवर बांधलेल्या ११ बंधारे वादात सापडले असून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होवू लागलीय.. महाराष्ट्रात सिंचन प्रकल्प बांधतांना कशा पद्धतीने त्याची पळवा-पळवी केली गेलीय त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे लोणी सांगवी बंधारा...हा बंधरा जालना जिल्ह्यासाठी मंजूर झाला होता..मात्र प्रत्येक्षात तो परभणी जिल्ह्यात बांधला गेलाय... तुमचा विश्वास बसत नसेल पण हे सत्य आहे...
होय हाच तो लोणी सावंगी बंधारा.. जो जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्याच्या लोणी सावंगी गावात बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता..मात्र प्रत्यक्षात हा बंधारा परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात बांधण्यात आलाय...सिंचन खात्यातील लुघलकी कारभारचं हे उत्तम उदाहरण आहे.. मराठवाडा बॅरेजेस योजनेअंतर्गत मराठवाड्यात ११ बंधारे बांधण्य़ाचा निर्णय सरकारने घेतला होता त्यापैकी लोणी सावंगीचा बंधारा एक आहे...जालना जिल्ह्यासाठी बंधारा मंजूर झाला होता..तशी गोदावरी पाटबंधारे विभागाच्या दप्तरी नोंदही आहे...मात्र प्रत्येक्षात हा बंधारा परभणीला नेहण्यात आलाय.. बंधा-याची नियोजीत जागा बेमालूमपणे बदलण्यात आली..आणि विशेष म्हणजे तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवारांनी या बंधा-याचं उद्घाघाटन केलंय... या प्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचं आश्वासन विधिमंडळात येण्यात आलं होतं.. सुरुवातीला या बंधा-याचा नियोजीत खर्च २५ ते ३० कोटी रुपयांच्या घरात होता..पुढे तो खर्च थेट २०० कोटीवर जाऊन पोहोचला..पाटबंधारे खात्याने उच्च पातळी बंधारा बांधला खरा पण त्यात पाण्याची बोंब आहे..