कहाणी डायनोसॉरची

डायनोसॉर.. मानवजातीला कुतूहल असलेले एक अवाढव्य प्राणी.. चित्रपट, डॉक्युमेंटरी, रिसर्च अशा अनेक माध्यमातून माहीती समोर येऊनही डायनोसॉर बद्दलच कुतूहल हे शमत नाही.. पण आता मात्र डायनोसॉर भारतात पुन्हा चर्चेत आलेयत.. आणि यावेळी कारण ठरलय ते डायनोसॉरच्या अंड्याची होत असलेली तस्करी

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 9, 2013, 12:50 AM IST

डायनोसॉर.. मानवजातीला कुतूहल असलेले एक अवाढव्य प्राणी.. चित्रपट, डॉक्युमेंटरी, रिसर्च अशा अनेक माध्यमातून माहीती समोर येऊनही डायनोसॉर बद्दलच कुतूहल हे शमत नाही.. पण आता मात्र डायनोसॉर भारतात पुन्हा चर्चेत आलेयत.. आणि यावेळी कारण ठरलय ते डायनोसॉरच्या अंड्याची होत असलेली तस्करी.. जगाच्या बाजारात कोट्यवधी रुपयांची किंमत असलेल्या या डायनोसॉरची अंडी भारतात बेकायदेशीर पणे विकली जातात ती अवघ्या पाचशे रुपयात.. विश्वास बसत नाही तर पहा हा रिपोर्ट..

ज्याच्यात दडलाय डायनासोरच्या अस्तित्वाची कहाणी.या अंड्याची किमत कोट्यवधी रुपयांची कशी असेल हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.. पण ही गोष्ट विचारापलीकडची का आहे याचं उत्तर दडलय ते अंड कुणाचे आहे या प्रश्नात हे अंड आहे डायनासोरचं.. कोट्यवधी रुपये किमतीच्या या अंड्याची भारतात अज्ञानामुळे कवडीमोल भावानं विक्री होतेय.. मध्यप्रदेशात ही अंडी केवळ पाचशे पाचशे रुपयांना विकली गेलीय
भारत - पाचशे रुपये
आंतरराष्ट्रीय बाजार - १ करोड रुपये

जगाच्या बाजारात या डायनोसोरच्या अंड्य़ाची किमत कोटीच्या घरात आहे. कारण ही अंडी केवळ त्या डायनासोरचा नाही.. तर काळाच्या प़डद्याआड गेलेल्या डायनासोरच्या युगाच्या अस्तित्वाची कहाणी जगासमोर नव्यानं सांगणार आहेत.. आणि हिच कहाणी जगाला सांगेल मानवाच्या जन्माअगोदरचंही पृथ्वीच वास्तव...
होय एक काळ असा होता, कि ज्या वेळी या संपुर्ण पृथ्वीवर फक्त डायनोसोरचं राज्य होतं.. जिथ आज आपण जाण्याचा विचारही करु शकत नाही तिथं फक्त त्यांचा वावर होता.. जिथं आज आपल्या वास्तव्याच्या निशाणी आहेत , त्याच प्रदेशावर फक्त डायनासोरची सत्ता होती.. असं असताना अचानक नेमकं काय घडलं की, हे सत्ताधिश अचानक जगाच्या नकाशावरुन लुप्त झाले.. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील या डायनासोरच्या अंड्यामधून..
ही अंडी साडे सहा करोड वर्षापासून ते साडे चौदा वर्षापर्यंत पुरातन असू शकतात.. तुमच्या मनात प्रश्न हा ही असेल की या अंड्याचे आणि डायनासोरचं भारताशी नात आहे.. त्याचं कारण आहे की, ही अंडी मध्यप्रदेशच्या काही भागांमध्ये ही अंडी वारंवार मिळतात.. मध्यप्रदेशच्या आबोहवा भागातच प्राचीन काळात ही अंडी नेमकी का मिळतायत ?..भारताच्या भुपृष्ठावर नेमके कोणकोणते डायनोसॉर्स असायचे..? आणि भारतातूनही का नष्ट झाले डायनोसॉर्स ? याच प्रश्नांच्या शोधात संशोधक संशोधन करतायत.. आणि म्हणूनच कोट्यवधीच्या डायनोसॉर्सच्या अंड्याची लूट सुरु आहे. मध्यप्रदेशातील ही किमती अंडी आणि डायनोसॉर्सच्या हाडांची कळत नकळत विक्रीचे प्रमाण वाढत चाललय..
एका अंड्याची किंमत एक कोटी रुपये.. याच कारण आहे ते अंडे.. डायनोसॉरच्या अंड्याला आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधी रुपयांची किंमत आहे. मध्यप्रदेशमधील त्य़ा घटनेनं सारेच जण हादरुन गेलेत.. जबलपूरमध्ये सापडलेली डायनोसॉरच्या अंड्याची केवळ पाचशे रुपयात विक्री करण्यात आलीय. तस्करानी आता मध्यप्रदेशाच्या जंगलात याची शोधाशोध सुरु केलीय. पण असं नेमक काय होत मध्यप्रदेशाच्या मातीत, की ज्यामुळे डायनोसॉरचे अवशेष तिथ सापडतायत..
मध्यप्रदेशचं आणि कोट्यवधी रुपये किमतीच्या या डायनोसॉरच्या अंड्याचं नेमकं नातं काय आहे? डायनोसॉरचं जबलपुर, धार भागात खरचं वास्तव्य होतं का..अशी नेमकी काय कारणं आहेत कि ज्यामुळे नर्मदेच्या आसपासच्या भागात डायनोसॉरचे अवशेष आणि अंडी सापडतायत..

जबलपूरच्या या खडकाळ भागाला लम्हेटा फॉर्मेशन नावानं ओळखलं जातं.. या बरोबरच या भागामध्ये डायनोस़ॉरच्या वेगवेगळ्या प्रजाती राहत असल्याचं संशोधनात समोर आलयं. डायनोसॉरचे युग संपल असलं तरी त्याच्या अस्तित्वाची कहाणी आजही समोर येतायत.. डायनोसॉ़रची अंडी आजही मध्यप्रदेशात मिळतात.. आणि म्हणूनच देशाविदेशातून अनेक पर्यटक आणि संशोधक या ठिकाणी येतात आणि अगदी खुलेआमपणे ही अंडी परदेशातून नेली जातायत..
संशोधकानी केलेल्या अभ्यासानुसार, जबलपूर आणि आसपासच्या भागांमध्ये डायनोसॉरला आवश्यक असणारा जलवायु मोठ्या प्रमाणात होता..

एकाद्या पुराश्म खडकाप्रमाणे दिसणारे ही अंडी आणि डायनोसॉरची अंडी.. संशोधकाना अतिशय महत्वाची ठऱणारी आहेत..

मध्यप्रदेशमीधील धार जिल्ह्यातील धर्मपुरीच्या जंगलात उत्खनन करताना हे अवशेष सापडलेत ज्याचा आकार डायनोस़ॉरशी मिळताजुळता आहे.. आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अंड्याची स्थानिकांकडून विक्री केवळ पाचशे रुपयात होतेय.. खुलेआम होत असलेला हा प्रकार वनविभागाचे अधिक