नाशिक महापौरपदाचा गुंता वाढला

नाशिकमध्ये महापौरपदाचा तिढा वाढलाय. शिवसेनेनं महापौरपदासाठी हालचाली सुरू केल्यात. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशी चर्चा आहे. तर भाजप मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.

Updated: Mar 9, 2012, 05:44 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

नाशिकमध्ये महापौरपदाचा तिढा वाढलाय. शिवसेनेनं महापौरपदासाठी हालचाली सुरू केल्यात. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशी चर्चा आहे. तर भाजप मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं युतीमध्ये महापौरपदावरुन तणाव असल्याची चर्चा आहे. सत्तेच्या या राजकारणामुळं नाशकात महापौर कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

 

 

नाशिकमध्ये शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचा दावा शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केलाय. महायुतीचा महापौर बसवण्यासाठी शिवसेनेनं अपक्षांच्या मदतीने मोर्चेबांधणी सुरू केलीय. त्सासाठी शिवसेनेच्या भाजप, अपक्षांसोबत स्वतंत्र बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे हा मनसेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जातंय. नाशिकमध्ये 15 मार्चला महापौरपदाची निवडणूक होणार आहे. शिवसेनेच्या या खेळीमुळं मात्र मनसेमध्ये संतापाचं वातावरण आहे.

 

 

आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे, अशी भूमिका शिवसेनेच्या काही नेत्यांनी घेतल्यामुळे नाशिकमध्ये कोणत्या पक्षाचा महापौर होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. मनसे महापौरपदासाठी दोन उमेदवार उभे करणार आहे. दगाफटका टाळण्यासाठी मनसेतर्फे शशिकांत जाधव आणि यतीन वाघ महापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. तर उपमहापौरपदासाठी रमेश धोंबडे आणि अशोक मुर्तडक अर्ज दाखल करणार आहेत. दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेत मनसेनं साधव पवित्रा घेतलाय.