विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा - शरद पवार

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन महिने मिळणार आहेत. या कालावधीत मंत्र्यांनी जोमाने कामावे लागवे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 10, 2014, 05:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन महिने मिळणार आहेत. या कालावधीत मंत्र्यांनी जोमाने कामावे लागवे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक आज झाली. यामध्ये पवारांनी लोकसभेच्या कामगिरीचा आढावा घेतला. प्रलंबित निर्णय लवकर घ्या, तसंच विधानसभा निवडणूक तयारीसाठी मंत्र्यांनी राज्यभर दौरे करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. तर दुसरीकडे लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्य मंत्रिमंडळामध्येही फेरबदल होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.मंत्रिमंडळातील या फेरबदलांमध्ये कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाची वर्णी लागणार, याबाबतची जोरदार चर्चा सध्या रंगलीय.
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे आणि मदत पुनर्वसन राज्य मंत्री सुरेश धस यंदा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. ते खासदारपदी निवडून आल्यास त्यांच्या जागी कोण मंत्री होणार, यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरूवात झाल्याचे समजतं. येत्या 16 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.